Pimpri Chinchwad | लग्नाचे अमिष दाखवून महिलेवर अत्याचार; हिंजवडीमधील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2023 15:23 IST2023-04-11T15:22:05+5:302023-04-11T15:23:40+5:30
फिर्यादीकडून तब्बल तीन लाख रुपये घेत मानसिक व शारिरीक त्रास दिला...

Pimpri Chinchwad | लग्नाचे अमिष दाखवून महिलेवर अत्याचार; हिंजवडीमधील घटना
पिंपरी : लग्नाचे अमिष दाखवून महिलेवर अत्याचार केला. तसेच तिच्याकडून तीन लाख रुपये घेत तिला त्रास दिला. ही घटना जुलै २०१९ ते १२ सप्टेंबर २०२२ या कालावधीत हिंजवडी, भोसरी परिसरात घडली. या प्रकरणी महिलेने सोमवारी (दि.१०) भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. त्यानुसार पोलिसांनी राकेश रविंद्रनाथ नायर (वय २२, रा. भोसरी) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिेेलेल्या माहितीनुसार, आरोपी याने फिर्यादी यांना लग्नाचे अमिष दाखवून जबरदस्तीने त्यांच्या मनाविरुद्ध शारिरीक संबंध ठेवले. तसेच फिर्यादी याच्याकडून तब्बल तीन लाख रुपये घेत मानसिक व शारिरीक त्रास दिला, असे फिर्यादीत नमूद आहे.