शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

शीतपेयातून गुंगीचे औषध देऊन अत्याचार; हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2020 19:31 IST

व्हिडीओ तयार करून दिली जीवे मारण्याची धमकी

ठळक मुद्देवेळोवेळी बावधन येथील फ्लॅटवर येऊन शारीरिक संबंधाची मागणी बावधन, पौड, शिवतीर्थनगर, कोथरूड येथे २००७ ते २ डिसेंबर २०१९ या कालावधीत अत्याचारआरोपीची पीडित महिलेशी नृत्याच्या कार्यक्रमाच्यावेळी झाली ओळख

पिंपरी : ओळख झाल्यानंतर महिलेशी फोनवरून जवळीक साधली. त्यानंतर लग्नाची मागणी करून शीतपेयातून गुंगीचे औषध देऊन तिच्यावर अत्याचार केला. अत्याचाराचा व्हिडिओ तयार करून पीडित महिलेवर वारंवार अत्याचार केला. तसेच जीवे मारण्याचीही धमकी दिली. बावधन, पौड, सिंहगड रोड, शिवतीर्थनगर, कोथरूड येथे २००७ ते २ डिसेंबर २०१९ या कालावधीत हा प्रकार घडला. याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुधीर वसंत कर्नाटकी (रा. कोथरूड), सतीश बोरा (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी ३७ वर्षीय महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीची पीडित महिलेशी नृत्याच्या कार्यक्रमाच्या वेळी ओळख झाली. तिथे त्याने महिलेचा मोबाइल नंबर घेतला. त्यानंतर महिलेशी मोबाइलवरून जवळीक करून लग्नाची मागणी घातली. त्यासाठी महिलेने नकार दिला. त्यामुळे पहिल्या पत्नीला घटस्फोट देऊन त्यांच्याशी लग्न करणार असल्याचे आरोपीने आश्वासन दिले. त्यानंतर महिलेचा विश्वास संपादन करून त्यांना बावधन येथे एक फ्लॅट भाड्याने घेऊन तेथे महिलेला नेऊन त्यांना गुंगीचे औषध देऊन जबरदस्ती करून त्यांच्यावर अत्याचार केला. त्यानंतर, वेळोवेळी बावधन येथील फ्लॅटवर येऊन शारीरिक संबंधाची मागणी केली. त्यासाठी महिलेने नकार दिला असता आरोपीने पीडित महिलेशी शारीरिक संबंध प्रस्थापित करतानाचा तयार केलेला व्हिडिओ दाखवून तो व्हायरल करण्याची धमकी दिली. त्याआधारे पीडित महिलेवर वेळोवेळी अनैसर्गिक अत्याचार केला. यात पीडित महिला गरोदर राहिली. त्यांचा गर्भपात केला. त्यानंतर आरोपीने पीडित महिलेला कोथरूड येथील कार्यालयावर बोलवून ५०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर सही करण्यास सांगितले. त्यासाठी देखील महिलेने नकार दिला असता त्यांना जीवे मारण्याची धमकी देऊन स्टॅम्प पेपरवर सही करण्यास भाग पाडले. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडRapeबलात्कारWomenमहिलाCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस