शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

लग्नाच्या विषयाला टाळाटाळ,गरोदर प्रेयसीला रबडीतून गर्भपाताची गोळी; हिंजवडीतील भयंकर प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2025 13:34 IST

लग्नाचा विषय काढला असता आदर्शने टाळाटाळ केली. मागील वर्षी आदर्शने तरुणीवर एका हॉटेल मध्ये जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले.

पिंपरी - लग्नाचे आमिष दाखवून तरूणीशी वेळोवेळी शारीरिक संबंध ठेवल्याने ती गरोदर राहिली असता तिच्या नकळत रबडीमध्ये गर्भपाताची गोळी खायला घालून तिचा गर्भपात केला. तसेच, तिच्याशी लग्न करण्यास नकार दिल्याप्रकरणी प्रियकराच्या विरोधात हिंजवडी पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार हिंजवडी येथे 31 डिसेंबर 2023 ते 3 जुलै 2025 या कालावधीत घडला. आदर्श वाल्मीक मेश्राम (28, लक्ष्मी चौक, हिंजवडी, मुळ रा. बल्हारशहा, चंद्रपूर) असे गुन्हा दाखल झालेल्या प्रियकराचे नाव आहे. 28 वर्षीय पिडीत तरूणीने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

आरोपी आदर्श आणि पीडित तरुणी एकमेकांना कॉलेज जीवनापासून ओळखत होते. आदर्श हा हिंजवडी मधील एका कंपनीत काम करतो. तर पीडित तरुणी इलेक्ट्रिकल ठेकेदार आहे. सन 2018 पासून दोघांचे प्रेमसंबंध होते. लग्नाचे आमिष दाखवून त्याने तरुणीवर सतत शारीरिक संबंध ठेवले. लग्नाचा विषय काढला असता आदर्शने टाळाटाळ केली. मागील वर्षी आदर्शने तरुणीवर एका हॉटेल मध्ये जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. त्याला विरोध केला असता त्याने तरुणीला मारहाण केली. 23 जून 2025 रोजी आदर्श याचा वाढदिवस होता. त्याच्या वाढदिवसाला तरुणी यवतमाळ येथून पुणे येथे आली होती.

त्यावेळी आदर्श च्या मोबाईल मध्ये अन्य तरुणींसोबत त्याचे संबंध असल्याचे पुरावे तरुणीला मिळाले. दरम्यान ती गरोदर होती. आदर्श याची पूर्वीची प्रेमिका देखील पीडित तरुणीला भेटली. तिला देखील आदर्श याने लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला होता. 3 जुलै रोजी आरोपी आदर्श याने तरुणीच्या नकळत तिला रबडीमध्ये गर्भपाताची गोळी खयला घातली आणि तिच्या संमतीशिवाय व इच्छेविरूद्ध तिचा गर्भपात केला. त्यानंतर तिच्यासोबत लग्न करण्यास नकार दिला. काही दिवस उपचार घेतल्यानंतर तिने पोलिसात धाव घेतली.

आरोपी यवतमाळ परिसरात आहे. त्याचा शोध सुरु आहे. त्याला अटक करण्यासाठी टीम पाठवण्यात आली असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे यांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड