शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत बरसणार, कोकणात मुसळधार; पुढील २४ तासांसाठी असा आहे हवामान अंदाज
2
राज्यसभेसाठी सुनेत्रा पवारांच्या उमेदवारीची भुजबळांकडून घोषणा; नाराजीच्या चर्चेवरही केलं भाष्य
3
आनंदाची बातमी! चांदी घसरली, 2000 रुपयांनी कोसळली! सोनंही 600 रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या 'लेटेस्ट रेट'
4
"सरकार बदलायचे आहे"; शरद पवारांच्या विधानानंतर भुजबळ गंभीर; म्हणाले, "ते कामाला लागलेत"
5
मनोज जरांगे आणखी आक्रमक होणार?; आरक्षणाबाबत सरकारला नवा अल्टिमेटम, म्हणाले...
6
सफरचंदावर का लावतात स्टिकर?; ९९% लोकांना माहीत नाही सत्य; किमतीशी नाही, आरोग्याशी संबंध
7
पेमा खांडू यांनी तिसऱ्यांदा घेतली अरुणाचल प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ
8
'हे' आहेत देशातील टॉप 10 श्रीमंत खासदार; संपत्ती वाचून व्हाल धक्क!
9
करुन दाखवलं! रिसेप्शनिस्टचं काम, जर्मनीतील नोकरी सोडली अन् स्वप्न साकार केलं; झाली IPS
10
'कृपा करा आणि बाजूला व्हा'; सेल्फी घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या चाहत्यावर संतापली तापसी
11
"दिवाली हो या होली, अनुष्का लव कोहली", Virat Kohli समोर चाहत्यांची घोषणाबाजी
12
"आम्हाला पण लिहिता येतं, रोष कुणावर आहे हे जरा..."; RSS च्या टीकेला राष्ट्रवादीचे प्रत्युत्तर
13
याला म्हणतात 'ढासू' रिटर्न...! ₹१५ च्या शेअरनं ₹1 लाखाचे केले ₹2 कोटी; दिला 25,000% चा परतावा, केलं मालामाल
14
सारा अली खानसोबत ब्रेकअपनंतर सिंगल आहे कार्तिक आर्यन, अनन्या पांडेसोबतही जोडलं गेलं नाव
15
Pankaja Munde : Video - "जीव देऊन भागणार नाही रे बाळांनो, तुम्हाला माझी शपथ"; पंकजा मुंडेंची हात जोडून विनंती
16
अंतरवलीला उपोषणासाठी निघालेले ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंना बार्शीत अटक
17
अजब-गजब! चीनने सार्वजनिक टॉयलेटच्या बाहेर लावले 'टायमर'; सोशल मीडियावर चर्चा
18
PAK vs IRE : पाकिस्तानची डोकेदुखी वाढली; पाऊस शेजाऱ्यांना वर्ल्ड कपमधून बाहेर करणार?
19
एकाच वेळी 2 गुड न्यूज अन् शेअर बाजार पुन्हा विक्रमी उच्चांकावर; Sensex-Nifty नं घेतला रॉकेट स्पीड!
20
Video - कुवेतमध्ये अग्नितांडव! १९६ मजुरांना इमारतीत ठेवलेलं कोंबून; झोपेतच गमावला जीव

कानाखाली मारल्याने टोळक्याकडून तरुणाचा चाकूने वार करून खून; वाकडमधील घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2022 12:38 PM

पोटावर चाकूने वार करून खून....

पिंपरी : गटारी अमावास्येनिमित्त पार्टी करायला नदीकडेला मोकळ्या मैदानात बसलेल्या तरुणांच्या गटामध्ये कानाखाली चापट मारल्याच्या कारणावरून वाद झाला. या वादातून नऊजणांच्या टोळक्याने एकाच्या पोटावर चाकूने वार करून खून केला, तर अन्य दोघांवर जीवघेणा हल्ला केला. यापैकी एकजण गंभीर जखमी झाला. ही घटना गुरुवारी (दि.२८) रात्री साडेसातच्या सुमारास वाकड गावठाण येथे घडली.

दीपक भगवान गायकवाड ऊर्फ खंडू (वय १९, रा. म्हातोबानगर, वाकड) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे, तर लखन अंकुश लगस (२२, रा. म्हातोबा नगर) हा गंभीर जखमी झाला. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी आदित्य अशोक थोरात (१९, रा. पॉलाराईस हॉस्पिटल जवळ, वाकड) याने फिर्याद दिली, तर सुमित सावंत (२१), अमोल देशमुख (२४), अभिषेक ऊर्फ नंदू कांबळे (२०), सुजित लोंढे (१८), आशिष भिसे ऊर्फ मर्फी, ब्रम्हा जाधव (२०), महेश जाधव (२४), सौरभ जाधव (१८) यांच्यासह एका १६ वर्षीय अल्पवयीन आरोपीला पोलिसांनी अटक केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाकड येथील मुळा नदीकाठी मोकळ्या मैदानात दीपक गायकवाड आणि आरोपी हे दोन वेगवेगळया ग्रुपमध्ये गटारी साजरी करत होते. दुपारी दीपक गायकवाड याने सुजित लोंढे याला कानाखाली चापट मारली. त्याने ही बाब अन्य मित्रांना सांगितली. तेव्हा हे सर्वजण तिथून निघून गेले. सायंकाळी सातच्या सुमारास ते सर्वजण वाकड गावठाण येथे थांबले. काही वेळाने दीपक जवळ येताच टोळक्याने त्याच्यावर हल्ला केला. सुरुवातीला दगड-विटाने मारहाण केली. नंतर एकाने वाहनामधील चाकू काढून दीपकच्या पोटावर वार केले, तर लखन लगस याच्या डोके, हात व पोटावर वार करण्यात आले. वाकड पोलीस अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीwakadवाकडpimpri-acपिंपरी