दहीहंडीच्या कार्यक्रमातून निघून आला म्हणून तरुणावर वार
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2022 13:55 IST2022-08-22T13:54:01+5:302022-08-22T13:55:01+5:30
पिंपरी : दहीहंडीच्या कार्यक्रमातून तू निघून का आलास, असे म्हणत तरुणाच्या हातावर कटरने वार करण्यात आले. याप्रकरणी दोघांविरूद्ध गुन्हा ...

दहीहंडीच्या कार्यक्रमातून निघून आला म्हणून तरुणावर वार
पिंपरी :दहीहंडीच्या कार्यक्रमातून तू निघून का आलास, असे म्हणत तरुणाच्या हातावर कटरने वार करण्यात आले. याप्रकरणी दोघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शुक्रवारी (दि. १९) चिखली येथे घडली.
याप्रकरणी संतोष प्रभाकर काळबांडे (वय १९, चिखली) याने शनिवारी (दि. २०) चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून पोलिसांनी अशोक निर्मल, अजय संतोष भागवत (वय २१, दोघे रा. जाधववाडी, चिखली) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हा दूध आणण्यासाठी दुकानात गेला होता. त्यावेळी आरोपी तेथे आले. जुन्या भांडणाच्या रागातून आरोपी अशोक याने ‘संतोष, दहीहंडीच्या कार्यक्रमातून निघून का आलास. तुला दात आले का?’ असे म्हणत कटर काढून फिर्यादीच्या हाताच्या कोपराजवळ मारला. तेव्हा फिर्यादीने पळून जाण्यासाठी अशोक याला धक्का दिला. मात्र, दुसरा आरोपी अजय याने फिर्यादीला घट्ट पकडून ठेवत ‘याला जिवंत सोडू नको, ठार मार’, असे म्हटल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.