भरधाव रिक्षा पलटी होऊन तरुणाचा मृत्यू, पिंपळे गुरव परिसरातील अपघात
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2023 13:21 IST2023-12-15T13:20:47+5:302023-12-15T13:21:24+5:30
पिंपरी : भरधाव रिक्षा पलटी होऊन तरुणाचा मृत्यू झाला. पिंपळे गुरव- पुणे रस्त्यावर ३ नोव्हेंबर रोजी हा अपघात झाला ...

भरधाव रिक्षा पलटी होऊन तरुणाचा मृत्यू, पिंपळे गुरव परिसरातील अपघात
पिंपरी : भरधाव रिक्षा पलटी होऊन तरुणाचा मृत्यू झाला. पिंपळे गुरव-पुणे रस्त्यावर ३ नोव्हेंबर रोजी हा अपघात झाला होता.
सागर सुरेंद्र साथी (वय २६, रा. दापोडी) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पोलिस अंमलदार श्याम साळुंके यांनी बुधवारी (दि. १३) सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार रिक्षा चालक सुजल राजेश केदारी (१९, रा. दापोडी) याच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रिक्षाचालक सुजल केदारी त्याच्या ताब्यातील रिक्षा भरधाव चालवत होता. यावेळी त्याची रिक्षा पलटी होऊन पुढच्या बाजूस बसलेला सागर जखमी झाला. जखमी सागरचा मृत्यू झाला, असे फिर्यादीत नमूद आहे. पोलिस उपनिरीक्षक जी. एस. ढगे तपास करीत आहेत.