क्रेनच्या धडकेत कामगाराचा जागेवर मृत्यू

By प्रकाश गायकर | Updated: January 19, 2024 19:04 IST2024-01-19T19:03:46+5:302024-01-19T19:04:33+5:30

रस्त्यावरून चालत असताना क्रेनने मागून जोरात धडक दिली

A worker died on the spot in a collision with a crane | क्रेनच्या धडकेत कामगाराचा जागेवर मृत्यू

क्रेनच्या धडकेत कामगाराचा जागेवर मृत्यू

पिंपरी : भरधाव वेगात असलेल्या क्रेनच्या धडकेत रस्त्याने चालत निघालेल्या एका कामगाराचा जागेवर मृत्यू झाला. ही घटना १४ जानेवारीला सायंकाळी रुपीनगर, तळवडे येथे घडली.

उमेश रमेश भोसले (वय ३६) असे अपघातातमृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. त्यांचे मेहूणे बाळासाहेब संदिपान जाधव (वय २८, रा. रोशनपुरी जि. बीड) यांनी या प्रकरणी चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, क्रेन चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे दाजी पॅकर्स आणि मुव्हर्सचे काम करतात. १४ जानेवारी रोजी ते रुपीनगर येथून रस्त्याने चालत निघाले होते. त्या वेळी भरधाव वेगात आलेल्या क्रेनने त्यांना मागून जोरात धडक दिली. या धडकेमुळे ते रस्त्यावर पडले. त्यानंतर त्यांच्या पायावरून क्रेनचे चाक गेले. या अपघातात गंभीर जखमी होऊन त्यांचा जागेवरच मृत्यू झाला. अपघातानंतर क्रेनचालक क्रेन घेऊन पळून गेला.

Web Title: A worker died on the spot in a collision with a crane