पिंपरीमध्ये जीवे मारण्याची धमकी देऊन अल्पवयीन मुलीवर बलात्कार
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2022 18:22 IST2022-08-03T18:19:57+5:302022-08-03T18:22:49+5:30
आरोपीच्या ओळखीच्या दुकानात फिर्यादी कामाला होती...

पिंपरीमध्ये जीवे मारण्याची धमकी देऊन अल्पवयीन मुलीवर बलात्कार
पिंपरी : जीवे मारण्याची धमकी देऊन अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्यात आला. ही घटना फेब्रुवारी २०२१ ते १ ऑगस्ट २०२२ या कालावधीत आळंदी, पिंपरी येथे घडली. याप्रकरणी पीडित मुलीने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी आरोपी दत्ता सुरेश गुजर (वय ४३, रा. पिंपळे सौदागर) याला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीच्या ओळखीच्या दुकानात फिर्यादी कामाला होती. तिच्याशी आरोपीने ओळख वाढवून तिला आळंदीतील लॉजवर नेले. फिर्यादी अल्पवयीन असल्याचे माहिती असून, तिला जीवे मारण्याची धमकी देत आरोपीने बलात्कार केला.
त्यानंतर पुन्हा काही दिवसांनी आरोपीने फिर्यादीला तिच्यावर झालेल्या बलात्काराबाबत ओळखीच्या लोकांना सांगू, असे धमकावत पुन्हा पिंपरी येथील लॉजवर नेऊन बलात्कार केला.