शहरं
Join us  
Trending Stories
1
परदेशात डॉक्टरी शिकून थेट भारतात प्रॅक्टीस करण्याचा मार्ग सोपा होणार; एनएमसी आणतेय नवे नियम...
2
Nitin Shete: मोठी बातमी! शनि शिंगणापूर संस्थानचे सीईओ नितीन शेटे यांनी संपवलं आयुष्य
3
"अल्लाह हू अकबर, विमानात बॉम्ब, मी तो उडवून देईन", प्रवाशाच्या धमकीनंतर विमानाचे आपत्कालीन लँडिंग
4
'मौन व्रत, मौन व्रत...', संसदेत बोलणाऱ्या काँग्रेस खासदारांच्या यादीतून शशी थरुर यांना वगळले
5
IND vs ENG: "शुबमन गिलने जर शतक केलं नसतं तर..."; प्रशिक्षक गौतम गंभीरने ठणकावून सांगितलं
6
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
7
Shravan Somvar 2025: महादेवाला केतकीची फुले वाहू नये; त्यामागे आहे एक पौराणिक कथा!
8
'बॉर्डर २'मध्ये वरुण धवनसोबत झळकणार 'ही' अभिनेत्री, मेकर्सने केली अधिकृत घोषणा
9
एक फोन कॉल लीक, शिव मंदिरासाठी शत्रू बनले शेजारी; आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू
10
Pune Video: लाज लज्जाच सोडली! पुण्यात जोडप्याचे दुचाकीवरच अश्लील चाळे; व्हिडीओ व्हायरल 
11
अरे बापरे! फक्त डोळ्यांनाच नाही तर त्वचेसाठीही घातक आहे फोनच्या स्क्रीनमधून येणारी ब्लू लाईट
12
ठाकरे ब्रँडला शह देण्यासाठी रणनीती, मुंबईत एकत्र लढेल महायुती! 'प्लॅन बी'चीही तयारी...
13
बारामती हळहळलं ! २४ तासात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू, वडिलांनी देखील घेतला अखेरचा श्वास
14
Nag Panchami 2025: नागपंचमीला आठवणीने 'या' ८ नागांचे स्मरण करा; अकाली मृत्युचे भय घालवा!
15
बांगलादेशच्या मोहम्मद युनूस यांचे सूर बदलले, म्हणाले, 'भारताचे मनापासून आभार...', नेमकं कारण काय?
16
शाहरुख-सलमानच्या घराबाहेर चाहत्यांची गर्दी, पण आमिरच्या का नाही? अभिनेता म्हणाला...
17
आणखी एका चीनसाठी जागा नाही, भारतानं 'पुढचा ड्रॅगन' बनण्याचं स्वप्न सोडावं; रघुराम राजन यांचा इशारा
18
VIDEO: शटल कॉक घेऊन उभा राहिला अन् जोरात कोसळला…; २५ वर्षाच्या तरुणाचा धक्कादायक मृत्यू
19
Shreyasi Joshi : पुण्याच्या लेकीची कमाल; आशियाई रोलर स्केटिंग चॅम्पियनशिपमध्ये गोल्ड मेडल जिंकणारी पहिली भारतीय
20
देशातील सर्वात स्वस्त ईलेक्ट्रीक कार १५००० रुपयांनी महागली; वर्षात तिसऱ्यांदा वाढ...

कामावर का जात नाही, असे विचारल्याने दारुड्या मुलानेच केला आईचा खून; पिंपरीतील धक्कादायक घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2023 13:19 IST

तरुण चार वर्षानंतर जेलमधून सुटल्यानंतर दारुचा व्यसनी झाला

पिंपरी : कामावर का जात नाही, अशी विचारणा महिलेने तिच्या मुलाला केली. याचा राग आल्याने मद्यपी मुलाने सिमेंटचा गट्टू महिलेच्या डोक्यात मारला. त्यामुळे गंभीर जखमी झालेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी मुलाला अटक केली. हा प्रकार ९ मार्च रोजी निराधार नगर, पिंपरी येथे घडला. 

परेगाबाई अशोक शिंदे (वय ५८), असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. विश्वास अशोक शिंदे (वय ३०, रा. निराधानगर, पिंपरी) असे अटक केलेल्या मुलाचे नाव आहे. पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट दोनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार, परेगाबाई यांचा मुलगा विश्वास हा कचऱ्याच्या घंटागाडीवर मजूर म्हणून काम करत होता. खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी विश्वास हा २०१५ पासून चार वर्षे येरवडा जेलमध्ये होता. जेलमधून सुटल्यानंतर विश्वास दारुचा व्यसनी झाला. नशेत तो विनाकारण त्याची आई परेगाबाई यांच्याशी भांडणतंटा करायचा. परेगाबाई या कचरा गोळा करण्याचे काम करून कुटूंबाचा उदरनिर्वाह करीत होती.

दरम्यान, ९ मार्च रोजी सकाळी आठच्या सुमारास दारुच्या नशेत झोपलेला विश्वास याला उठवण्याचा परेगाबाई यांनी प्रयत्न केला. कामावर का जात नाही, अशी विचारणा परेबाईने केली. त्याचा राग आल्याने परेगाबाई यांच्या डोक्यात सिमेंटचा ब्लॉक (गट्टू) मारला. त्यामुळे ती जिव वाचविण्यासाठी पळत सुटली. विश्वास याने पाठलाग केला. त्यावेळी परेगाबाई पायात पाय अडकून पडली. तिचा आरडाओरडा ऐकून लोक जमा झाले. त्यावेळी विश्वास निघून गेला. परेगाबाई व विश्वास यांच्यातील भांडणाबाबत शेजारच्यांना माहिती होते. परंतू, ती पाय घसरून पडून गंभीर जखमी झाली असा समज होता. परेगाबाई यांना त्यांच्या मुलीने तळेगाव येथील रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान परेगाबाईचा मृत्यू झाला.  याबाबत गुन्हे शाखा युनिट २ च्या पथकाने तपास सुरू केला. आईचा मृत्यू झाल्याचे समजल्यानंतर विश्वास शिंदे पळून जाण्याच्या तयारीत होता. त्यावेळी पोलिसांनी त्याला पकडले. त्याच्या विरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. गुन्हे शाखा युनिट २ चे पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम, उपनिरीक्षक गणेश माने, सहायक फौजदार शिवानंद स्वामी, पोलीस कर्मचारी दिलीप चौधरी, आतिश कुडके, अजित सानप, शिवाजी मुंढे, उध्दव खेडकर यांनी केली आहे.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटकDeathमृत्यू