Pimpri Chinchwad: दारातून कुत्र्याचे पिल्लू गेल्याने दोन कुटुंबात राडा, गुन्हा दाखल
By प्रकाश गायकर | Updated: January 20, 2024 16:47 IST2024-01-20T16:44:44+5:302024-01-20T16:47:13+5:30
ओमकार किरण वाघमारे (वय २०, रा. अशोकनगर, वाकड) व एका महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे...

Pimpri Chinchwad: दारातून कुत्र्याचे पिल्लू गेल्याने दोन कुटुंबात राडा, गुन्हा दाखल
पिंपरी : कुत्र्याचे पिल्लू शेजारी राहणाऱ्यांच्या घरासमोर गेले. त्याचा राग आल्याने शेजाऱ्यांनी पती-पत्नीला मारहाण केली. ही घटना अशोकनगर, वाकड येथे शुक्रवारी (दि. १९) सकाळी दहा वाजता घडली. याप्रकरणी महिलेने वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, ओमकार किरण वाघमारे (वय २०, रा. अशोकनगर, वाकड) व एका महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी फिर्यादी व त्यांचे पती घरी असताना त्यांच्या कुत्रीचे पिल्लू शेजारी राहणाऱ्या वाघमारे यांच्या घरासमोर गेले. त्याचा राग आल्याने संशयित आरोपी ओमकार वाघमारे यांने फिर्यादी यांच्या पतीला शिवीगाळ केली. तसेच घरामध्ये घूसून पतीला हाताने, लाथा बुक्क्यांनी व लाकडी दांडक्याने मारहाण केली. तसेच उजव्या हाताला चावून जखमी केले. फिर्यादी यांनी समजवण्याचा प्रयत्न केला असता त्यांना ढकलून दिल्याने त्यांच्या कमरेमध्ये दुखू लागले असल्याचे फिर्यादीमध्ये म्हटले आहे.