दापोडीत ६६ हजारांची घरफोडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2019 16:50 IST2019-03-03T16:48:47+5:302019-03-03T16:50:24+5:30

दापोडीत बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने ६६ हजार रूपये किंमतीचा ऐवज ऐवज चोरून नेला.

66 thousand stolen by breaking locked home in dapodi | दापोडीत ६६ हजारांची घरफोडी

दापोडीत ६६ हजारांची घरफोडी

पिंपरी : दापोडीत बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने ६६ हजार रूपये किंमतीचा ऐवज ऐवज चोरून नेला. या घरफोडीप्रकरणी शनिवारी भोसरी पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 

भोसरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दापोडीतील गणेश रेसिडेन्सी सोसायटीत चौथ्या मजल्यावर घरफोडी झाली. दत्तात्रय माणिकराव गायकवाड (वय ५७) यांनी अज्ञात चोरट्याविरूद्ध फिर्याद दाखल केली आहे. भोसरी येथील गणेश रेसिडेन्सी सोसायटीत राहणाºया दत्तात्रय गायकवाड यांचे घर बंद होते. कुलूप लावुन गायकवाड कुटूुंबिय बाहेर गेले होते. अज्ञात चोरट्याने दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. ३२  ग्रॅम सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा मिळून ६६ हजार  रुपयांचा ऐवज चोरट्यांनी पळवुन नेला. या प्रकरणी पोलिसांकडे फिर्याद दाखल झाली असून  या प्रकरणी वाकड पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Web Title: 66 thousand stolen by breaking locked home in dapodi