जनावरांचे जीव वाचविणार्‍या शिवदुर्गला 51 हजारांचे रोख बक्षिस

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2019 12:26 IST2019-08-06T12:25:24+5:302019-08-06T12:26:59+5:30

पुराच्या पाण्यात अडकलेल्या जनावरांचे प्राण वाचविणाऱ्या शिवदुर्ग मित्र या रेस्क्यु पथकाला 51 हजारांचे बक्षिस देण्यात आले.

51 thousand cash prize to Shivdurg for saving lives of animals | जनावरांचे जीव वाचविणार्‍या शिवदुर्गला 51 हजारांचे रोख बक्षिस

जनावरांचे जीव वाचविणार्‍या शिवदुर्गला 51 हजारांचे रोख बक्षिस

लोणावळा : पवनानगर (लोणावळा) जवळ कोथुर्ने गावात नदीपात्राशेजारी एका घरात 7 माणसं व बाजूला गोठ्यात  सुमारे 30 गाई म्हशी पाणी वाढल्यामुळे अडकून पडल्या होत्या, पाणी वाढतच राहिल्याने सगळ्यांचे जीव धोक्यात होते. याबाबतची माहिती समजल्यानंतर लोणावळ्यातील  शिवदुर्ग मित्र या रेस्कू पथकाने प्रयत्नांची शर्त करुन सर्व सात माणसं व 30 जनावरे पाण्यातून सुखरुप बाहेर काढली. मुक्या जनावरांचा जिव वाचविल्यानंतर गोठ्याचे मालक रामचंद्र नढे  व ग्रामस्थांनी शिवदुर्ग रेस्कु टीम चे कौतुक केले व रुपये 51,000 रोख स्वरूपात देवून संस्थेचा गौरव केला. 

शिवदुर्गची टीम आनंद गावडे, राजेंद्र कडू, महेश मसने, दिनेश पवार, राहुल देशमुख,  प्रणय अंभोरे, केदार देवाळे, विकास मावकर, सागर कुंभार, अनिल आंद्रे, तुषार सातकर, रोहीत वर्तक, रितेश कुडतरकर, सुनिल गायकवाड हे दोन दिवस हे रेस्कू कार्य करत होते.
 

Web Title: 51 thousand cash prize to Shivdurg for saving lives of animals