पिंपरी-चिंचवडमध्ये जप्त केला 3 किलो गांजा; एकाला अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2021 17:10 IST2021-11-16T17:05:30+5:302021-11-16T17:10:28+5:30
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ओटास्कीम, निगडी येथील एका घरात गांजा असल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी कारवाई करत श्याम पवार याला ताब्यात घेतले...

पिंपरी-चिंचवडमध्ये जप्त केला 3 किलो गांजा; एकाला अटक
पिंपरी : गांजा बाळगल्याप्रकरणी एकाला अटक केली आहे. त्याच्याकडून पाऊण लाखांचा सुमारे तीन किलो गांजा जप्त केला. पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने सोमवारी (दि. १५) सायंकाळी रामनगर झोपडपट्टी, ओटास्कीम निगडी येथे ही कारवाई केली.
श्याम बाबू पवार (वय ३७, रा. ओटास्कीम, निगडी, मूळ रा. दक्षिण वडगाव, गायरान, ता. करमाळा, जि. सोलापूर) याला पोलिसांनी अटक केली. त्याच्यासह संतोष (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) याच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलीस कर्मचारी संदीप पाटील यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ओटास्कीम, निगडी येथील एका घरात गांजा असल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी कारवाई करत श्याम पवार याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून ७३ हजार ६७५ रुपये किमतीचा दोन किलो ९४७ ग्रॅम गांजा जप्त केला. श्याम याने हा गांजा संतोष यांच्याकडून विकत आणला असल्याचे समोर आल्याने पोलिसांनी संतोष विरोधातही गुन्हा दाखल केला