पिंपरीत अंदमान यात्रेच्या नावाखाली २८ लाखांची फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2019 14:47 IST2019-04-13T14:46:42+5:302019-04-13T14:47:27+5:30
अंदमान यात्रेसाठी यात्रेकऱ्यांकडून २८ लाख ४ हजार १०० रुपयांची रक्कम घेतली.

पिंपरीत अंदमान यात्रेच्या नावाखाली २८ लाखांची फसवणूक
पिंपरी : अंदमान यात्रेसाठी यात्रेकऱ्यांकडून रक्कम घेतली. मात्र, त्यानंतर यात्रा न काढता तसेच बुकींगचे पैसे परत न देता यात्रेकरुंची २८ लाख ४ हजार १०० रुपयांची फसवणूक केली. संदीप वसंत राजपुरकर (रा. सरस्वती चाळ, दारुवाला ग्राउंड, मालाड, वेस्ट मुंबई) असे गुन्हा दाखल केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी सुनील सुरेश खोले (वय ४५, रा. अनामिका बिल्डिंग, तानाजीनगर, चिंचवड) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, अंदमान यात्रेसाठी यात्रेकरुंकडून घेतलेली रक्कम राजपुरकर याने बँक खात्यात ट्रान्सफर करुन घेतली. त्याबदल्यात यात्रेकरुंचे कोणतेही बुकींग केले नाही. खोले यांनी आरोपीच्या खात्यात यात्रेचे नियोजन करता ट्रान्सफर केलेल्या २८ लाख ४ हजार १०० रुपयांचा अपहार केला. दरम्यान, ही रक्कम परत न करता तसेच बुकींग न करता आरोपीने फियार्दी व यात्रेकरुंचा विश्वासघात करुन फसवणूक केली. याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.