शहरं
Join us  
Trending Stories
1
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
2
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
3
Pranjal Khewalkar: रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर
4
Bihar Election 2025: बिहार निवडणुकीत प्रशांत किशोर यांच्या पक्षाला किती जागा? कुणाला बसणार फटक? समोर आला धक्कादायक सर्व्हे!
5
“सरसकट भरपाई हाच योग्य मार्ग, एकरी ₹५० हजार इतकी थेट मदत तातडीने मिळाली पाहिजे”: जयंत पाटील
6
पैसे देता म्हणजे उपकार करता का? अजित पवारांच्या विधानावरुन उद्धव ठाकरे संतापले
7
डिजिटल अश्वमेध! STच्या मोबाईल अ‍ॅपला प्रवाशांचा तुफान प्रतिसाद; युजर्सची संख्या १० लाखांपार
8
"मतचोरीवरून मीसुद्धा सर्जिकल स्ट्राईक करणार’’, आदित्य ठाकरेंची मोठी घोषणा 
9
“३३ वर्षांनंतर महादेवीला न्याय, जिथे आहे तिकडे सुखरूप”; पेटा इंडियाचे समर्थन, मठाला सल्ला
10
एक नंबर! केसांसाठी ग्रीन टी 'वरदान'; गळणं थांबेल अन् चमत्कार दिसेल, फक्त 'असा' करा वापर
11
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत
12
IND vs WI: टेस्टच्या नव्या पर्वात 'ओल्ड इज गोल्ड फॉर्म्युला'! जड्डू टीम इंडियाचा 'पार्ट टाइम डेप्युटी'
13
मालेगाव बॉम्बस्फोट: निर्दोष मुक्तता झालेल्या प्रसाद पुरोहित यांना लष्कराने दिली बढती, कर्नल पदावर केली नियुक्ती
14
खऱ्या आयुष्यातला राया..! सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांबद्दल विचारताच लाजली पूजा बिरारी
15
शेअरचा धमाका...! या ₹3.90 च्या स्टॉकनं दिला छप्परफाड परतावा, ₹1 लाखाचे केले ₹2.09 कोटी; तुमच्याकडे आहे का?
16
ठरलं!! अश्विन भारताबाहेर पाकिस्तानी खेळाडूसोबत एकाच संघात, 'या' नंबरची जर्सी घालणार!
17
पुन्हा एकदा निराशा! गुंतवणूकदारांचे ३.२४ लाख कोटी बुडाले! 'या' कारणांमुळे बाजार धडाम
18
रोहितने ऑस्ट्रेलिया मालिकेआधी कमी केलं १० किलो वजन, फिटनेस पाहून भल्याभल्यांची 'बोलती बंद'
19
मुलीचे लग्न आहे दिवाळीत, कसं होईल ?... महिला शेतकऱ्याला अश्रू अनावर; धनंजय मुंडे म्हणाले, आक्का, सगळा खर्च माझा...
20
नवरात्र २०२५: ५ कामे अवश्य करा, नैराश्य दूर होईलच, आनंद वाटेल; भाग्योदय, घरात शुभ तेच घडेल! 

कोम्बिंग ऑपरेशनमध्ये २७ जणांना ठोकल्या बेड्या; पिंपरी-चिंचवड पोलिसांची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2022 08:30 IST

नाकाबंदीत ९७४ वाहनांची तपासणी...

पिंपरी : गुन्ह्यांना अटकाव करण्यासाठी पिंपरी-चिंचवडपोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन रावबले. यात सराईत गुन्हेगार, तडीपार, फरार आरोपी यांच्यावर कारवाई करण्यात आली. २७ जणांना अटक केली. तसेच नाकांबदी करून ९७४ वाहनांची तपासणी केली. 

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये मालमत्तेविरुध्दचे व शरीराविरुद्धचे संभाव्य गुन्ह्यांना अटकाव करण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. त्या अनुषंगाने सर्व पोलीस ठाण्यांच्या हद्दीत सोमवारी (दि. २२) रात्री १२ ते ते मंगळवारी (दि. २३) पहाटे तीन या वेळेत कोम्बिंग ऑपरेशन व नाकाबंदी करण्याचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी आदेश दिले होते. त्यानुसार सर्व पोलीस ठाणे व गुन्हे शाखेसह एकूण पाच सहायक पोलीस आयुक्त, २६ पोलीस निरीक्षक, ५५ सहायक निरीक्षक, उपनिरीक्षक, ४९६ अंमलदार यांची पथके तयार करण्यात आली. 

कोम्बिंग ऑपरेशन व नाकाबंदी दरम्यान पोलीस ठाणे व चौकी व गुन्हे शाखा यांनी रेकॉर्डवरिल ३९० आरोपीना चेक केले. सीआरपीसी १०७ प्रमाणे ०५, १०९ प्रमाणे  दोन व ११० प्रमाणे एक कारवाई केली. बीपी ॲक्ट १२२ प्रमाणे चार, कारवाई तर आर्म ॲक्टप्रमाणे एक, पाहिजे आरोपी एकूण २१ अटक तर फरारी आरोपी पाच अटक केले. नाकाबंदी दरम्यान ९७४ वाहने तपासून मोटार वाहन कायद्याप्रमाणे ८१ वाहनांवर ५१ हजार ३२५ रुपयांचा दंड आकारण्यात आला. अजामीनपात्र सहा तर जामीनपात्र चार वॉरंट बजवाले.

पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, अपर आयुक्त डॉ. संजय शिंदे, पोलीस उपायुक्त मंचक इप्पर, डॉ. काकासाहेब डोळे, आनंद भोईटे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड