शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

चिंचवडमध्ये आढळले अडीचशे वर्षांपूर्वीचे रिद्धी- सिद्धी गणपतीचे मंदिर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2025 18:33 IST

मंदिरात एकूण सहा मूर्ती असून शंकराची पूजा करताना रिद्धी- सिद्धी दिसून येत आहे

पिंपरी : पवना नदी तीरावरील चिंचवड ही भूमी भक्ती आणि शक्तीची मानली गेली आहे. या गावामध्ये अनेक पुरातन मंदिर आहेत. नवीन पूला जवळील रस्त्याजवळ रस्त्याचे आणि साफसफाई काम करत असताना सोमवारी अडीचशे वर्षे पूर्वीचे शंकराची पूजा करताना रिद्धी- सिद्धी गणपती असे मंदिर आढळून आले आहे.  

महासाधू मोरया गोसावी आणि क्रांतिवीर चापेकरबंधूंच्या भक्ती- शक्तीची साक्ष देणारे चिंचवडगाव आहे. या गावात अनेक देवदेवतांची पुरातन मंदिरे आहेत. पवना नदी तीरावर चिंचवडगावात चिंचेचा मळा प्रसिद्ध आहे. या परिसरामध्ये साफसफाई करत असताना मंदिर आणि मूर्तींचे अवशेष आढळून आले आहेत. हे मंदिर दोन फूट बाय तीन फूट आकाराचे असून त्या ठिकाणी मूर्ती आढळून आलेले आहेत. हे मंदिर काळ्या दगडातील असून चुना मिक्स करून साकारले आहे. 

काय आहे मंदिरात 

मंदिरात एकूण सहा मूर्ती असून शंकराची पूजा करताना रिद्धी- सिद्धी दिसून येत आहे.  तसेच नंदी हा भग्न अवस्थेत आहे, तसेच पिंडही दिसून येत आहे.  येथील गणपती हा पद्मासनातील असून त्यावर मुकुट दिसून येत आहे. 

पुष्करणीही होती 

संबंधित ठिकाणी पुष्करणी होती. या पुष्करणी मधील पाणी गावातील मंदिरांसाठी वापरले जात होते. कालांतराने ही पुष्करणी नष्ट झाली. त्या जवळील भागातच छोटेसे मंदिर आढळले आहेत. मंदिर हे ६ बाय ५ फूट आकाराचे आहे. तसेच अडीच बाय अडीच आकाराच्या दगडामध्ये या मूर्ती कोरलेल्या असल्याचे दिसते. सुंदर या मूर्ती सुंदर असून अलंकार शोभनीय आहे.

चिंचवडगावामध्ये आजपर्यंत अनेकवेळा उत्खनन झाले. त्यावेळी देवदेवतांची मंदिरे आढळून आली आहेत. पवना नदीपात्रालगत वायव्य दिशेला चिंचेचा मळा आहे. त्या ठिकाणी पूर्वी वेस होती.  या ठिकाणी स्वच्छता करत असताना मंदिर आढळले आहे. हे मंदिर साधारणपणे अडीचशे वर्षांपूर्वीचे जुने असावे, असा अंदाज आहे.  - ब. ही चिंचवडे (इतिहासाचे अभ्यासक)

English
हिंदी सारांश
Web Title : 250-Year-Old Riddhi-Siddhi Ganpati Temple Found in Chinchwad

Web Summary : A 250-year-old Riddhi-Siddhi Ganpati temple was discovered in Chinchwad during cleaning near the Pavana River. The small stone temple contains six idols, including a Shiva-worshipping Ganpati and a broken Nandi. A former water reservoir was nearby.
टॅग्स :Puneपुणेganpatiगणपती 2025TempleमंदिरOld shiv Templeप्राचीन शिव मंदीरSocialसामाजिकhistoryइतिहास