चिंचवड येथून बंदुकीच्या धाकाने २३ वर्षीय तरुणीचे अपहरण करणारा पोलिसांच्या ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 20:11 IST2021-01-19T20:10:24+5:302021-01-19T20:11:42+5:30
संबंधित युवतीशी आरोपीचे पूर्वी प्रेमसंबंध होते..

चिंचवड येथून बंदुकीच्या धाकाने २३ वर्षीय तरुणीचे अपहरण करणारा पोलिसांच्या ताब्यात
पिंपरी : चिंचवडमधील रेल्वे पुलाखालून एका तेवीस वर्षीय युवतीचे मंगळवारी (दि. १९) सकाळी अकराच्या सुमारास अपहरण करण्यात आले. नियंत्रण कक्षाला याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तातडीने हालचाल करीत आरोपीला ताब्यात घेतले. शंतनू चिंचवडे (वय २५. रा. चिंचवड) असे आरोपीचे नाव आहे.
युवती सकाळी नेहमी प्रमाणे कामावर जाण्यास निघाली होती. त्या वेळी आरोपीने बंदुकीच्या धाकाने तिला दुचाकीवर बसविले. काही नागरिकांनी त्याची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला कळविली. पोलिसांनी त्याची गांभीर्याने दखल घेत आरोपीला पकडले. संबंधित युवतीशी आरोपीचे पूर्वी प्रेमसंबंध होते. त्यांच्यातील नात्यात फारकत आल्याने आरोपीने अपहरण केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. पोलिसांनी आरोपीस ताब्यात घेतले असून, मंगळवारी (दि. १९) रात्री उशीरा पर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.