विक्रीसाठी गुटखा बाळगल्याप्रकरणी २१ वर्षीय तरुणाला अटक; ४८ हजारांचा गुटखा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2021 11:27 IST2021-08-05T11:27:18+5:302021-08-05T11:27:25+5:30

भोसरी पोलिसांनी दिघी रोड दुपारी चारच्या सुमारास ही कारवाई केली.

21-year-old arrested for selling gutka Gutkha worth Rs 48,000 seized | विक्रीसाठी गुटखा बाळगल्याप्रकरणी २१ वर्षीय तरुणाला अटक; ४८ हजारांचा गुटखा जप्त

विक्रीसाठी गुटखा बाळगल्याप्रकरणी २१ वर्षीय तरुणाला अटक; ४८ हजारांचा गुटखा जप्त

पिंपरी : विक्रीसाठी गुटखा बाळगल्याप्रकरणी तरुणाला अटक करण्यात आली. त्याच्याकडून ४८ हजार ४०० रुपयांचा गुटखा जप्त केला. भोसरी पोलिसांनी दिघी रोड, भोसरी येथे बुधवारी दुपारी चारच्या सुमारास ही कारवाई केली.

सागर अशोक गायकवाड (वय २१, रा. वाल्हेकरवाडी), असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. पोलीस कर्मचारी आशिष मल्लेश गोपी यांनी या प्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विक्री करण्याच्या उद्देशाने तरुणाने गुटखा बाळगला असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी कारवाई करून तरुणाला अटक केली. त्याच्याकडून ४८ हजार ४०० रुपयांचा गुटखा जप्त केला. पोलीस उपनिरीक्षक रवी भवारी तपास करीत आहेत.
 

Web Title: 21-year-old arrested for selling gutka Gutkha worth Rs 48,000 seized