पिंपरीत सापळा रचून २१ लाख ८५ हजारांचा गुटखा जप्त; सामाजिक सुरक्षा पथकाची कामगिरी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2020 14:36 IST2020-12-17T14:36:01+5:302020-12-17T14:36:21+5:30

तीन आरोपींविरोधात गुन्हा दाखल

21 lakh 85 thousand gutka seized in Pimpri; Social Security Squad Performance | पिंपरीत सापळा रचून २१ लाख ८५ हजारांचा गुटखा जप्त; सामाजिक सुरक्षा पथकाची कामगिरी 

पिंपरीत सापळा रचून २१ लाख ८५ हजारांचा गुटखा जप्त; सामाजिक सुरक्षा पथकाची कामगिरी 

पिंपरी : विक्रीसाठी गुटख्याची वाहतूक करणारा टेम्पो पकडून पोलिसांनी २१ लाख ८५ हजार ७०० रुपयांचा गुटखा जप्त केला. तसेच तीन आरोपींविरोधात वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पिंपरी-चिंचवडपोलिसांच्या सामाजिक सुरक्षा पथकाने थेरगाव फाटा चाैक, वाकड येथे मंगळवारी ही कारवाई केली. 

झुबेर लियाकत बाडीवाले (वय २५, रा. सावंतवाडी, सिंधुदुर्ग), फरीद शामशुद्दीन शेख (वय ३९, रा. मुंबई), स्वामी आण्णा/रसुल (पूर्ण नाव व पत्ता माहीत नाही.) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपी हे निपाणी येथून नाशिक येथे एका टेम्पोतून गुटखा घेऊन जाणार असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीत थेरगाव फाटा चाैक येथे सापळा लावला. त्यावेळी आरोपी यांचा टेम्पो तेथे आला असता पोलिसांची टेम्पो थांबवून पाहणी केली. त्यावेळी टेम्पोमधून पोलिसांनी २१ लाख ८५ हजार ७०० रुपयांचा गुटखा, १२ लाख १५ हजार रुपये किमतीचा एक टेम्पो, १२ हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल, २०० रुपये किमतीची एक तलवार, १२ हजार ५०० रुपयांची रोकड असा एकूण ३४ लाख २५ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.

Web Title: 21 lakh 85 thousand gutka seized in Pimpri; Social Security Squad Performance