शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: महिला आरक्षण विधेयक देशाची दिशा अन् दशा ठरवणारे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
4
"जर चिराग पासवानसोबत माझं अफेअर असतं तर आतापर्यंत...!" कंगना रणौत बिनधास्तच बोलली
5
अमेरिकेला हवं होतं 'या' देशाच्या आकाशावर नियंत्रण! पण भारतीय माध्यमांनी जगासमोर आणलं सत्य
6
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
7
Shocking: "मला जगायचं नाही, दोन्ही मुलांना विष दिलंय आणि मीही घेतलंय", पत्नीचा पतीला शेवटचा फोन!
8
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
9
Video: भन्नाट जुगाड! एका वेळी जास्त विटा उचलण्यासाठी मजुराने लढवली शक्कल, इंजिनियर्सही हैराण
10
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
11
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
12
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
13
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
14
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
15
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
16
IPL 2026: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
17
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
18
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
19
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
20
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
Daily Top 2Weekly Top 5

वाहतूक नियोजनात २० खाती सहभागी

By admin | Updated: April 24, 2017 04:41 IST

वाहतूक नियोजन ही पुण्यातील सध्याची सर्वांत मोठी समस्या आहे. बाणेर येथे झालेल्या अपघातामुळे ही गरज आणखीच वाढली आहे.

वाहतूक नियोजन ही पुण्यातील सध्याची सर्वांत मोठी समस्या आहे. बाणेर येथे झालेल्या अपघातामुळे ही गरज आणखीच वाढली आहे. महापालिकेत वाहतूक नियोजनासाठी म्हणून स्वतंत्र प्रकल्प विभाग आहे. त्यांनी भविष्यातील अंदाज करून त्याप्रमाणे उड्डाणपूल, स्कायवॉक, मल्टिस्टेज पार्किंग असे उपाय राबवायचे असतात. वाहतूककोंडी होऊ नये, अपघातांचे प्रमाण कमी व्हावे हा या विभागाच्या कामाचा प्रमुख उद्देश. खरेच त्याप्रमाणे काम होत आहे का, यावर या विभागाचे मुख्य अभियंता श्रीनिवास बोनाला यांनी टाकलेला प्रकाश...बोनाला म्हणाले, वाहतूक नियोजनात फक्त महापालिकेच्या प्रकल्प विभागाचाच नाही तर वेगवेगळ्या विभागातील तब्बल २० खात्यांचा सहभाग असतो. त्यांच्या परस्पर समन्वय व सहकार्यातून वाहतूक नियोजनाचे काम होत असते. असे असताना फक्त एकाच विभागावर त्याची जबाबदारी ढकलणे व त्यांच्यामुळे वाहतूक नियोजनाचा बोजवारा उडाला असे म्हणणे त्या खात्यावर अन्याय करणारे आहे.प्रकल्प विभाग प्लॅनिंग करत असतो. गेल्या २० वर्षांत शहरातील वाहतुकीत प्रचंड वाढ झाली आहे. त्याचा विचार करून अनेक उपाययोजना प्रकल्प विभागाने सुचवल्या आहेत. पे अ‍ॅण्ड पार्क हा त्यातीलच एक भाग आहे. पण खंत अशी आहे, की कोणालाही असे उपाय अमलात आणायचे नसतात, याचे कारण त्यामुळे नागरिकांची नाराजी वाढणार असते. पे अ‍ॅण्ड पार्क प्रत्यक्षात आले नाही, त्यामुळे आज कोणीही कुठेही वाहन लावत आहे. त्याचा वाहतुकीला त्रास होतो. कोंडी निर्माण होते. याला प्रकल्प विभागच कारणीभूत आहे असे म्हणणे म्हणजे विषयाची माहिती नसणेच आहे.उड्डाणपूल हा वाहतुकीच्या नियंत्रणाचा एक भाग आहे. तोच अंतिम आहे असे नाही. तसेच या पुलांची बांधणीही वेगवेगळ्या विभागांमार्फत होत असते. त्यात राज्य सरकारच्या काही खात्यांचाही सहभाग आहे. महापालिकेच्या प्रकल्प विभागाने बांधलेल्या उड्डाणपुलात काहीही अयोग्य नाही. उलट या विभागाची कार्यक्षमता पाहून मेट्रो सारख्या अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे कामही सोपवण्यात आले. ते पूर्ण केले व त्यावरच आता प्रत्यक्ष काम सुरू होणार आहे. तांत्रिक, प्रशासकीय तसेच व्यावसायिक अशा सर्व स्तरांवर प्रकल्प विभाग अव्वल आहे व वेळोवेळी ते सिद्ध झालेले आहे असा दावा बोनाला यांनी केला.अत्याधुनिक साधनांचा वापर करून निर्दोष काम करण्यासाठी पालिकेचा प्रकल्प विभाग प्रसिद्ध आहे असे स्पष्ट करून बोनाला म्हणाले, त्यामुळेच आमच्याकडे शहरातील जुन्या पुलांच्या दुरुस्तीचे काम सोपवण्यात आले. ते आम्ही उत्कृष्टपणे पूर्ण केले. स्काय वॉक, पादचाऱ्यांसाठी स्वतंत्र मार्ग अशा अनेक कामांचे नियोजन प्रकल्प विभागाने केले आहे. प्रकल्प विभागाने पुढच्या काही वर्षांचे नियोजन केले आहे. अनेक उपाय सुचवले आहेत, मात्र त्या सगळ्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधी लागतो. तो उभा करणे महापालिकेला अनेकदा शक्य होत नाही. त्यामुळे अशी कामे टप्पे तयार करून केली जातात. त्यामुळे दृश्य परिणाम दिसायला वेळ लागतो. त्याशिवाय अशा कोणत्याही नियोजनाला आपल्या व्यवस्थेत स्थायी समिती, सर्वसाधारण सभा यांची मान्यता घ्यावी लागते. ज्या विभागांशी संबंधित काम आहे, त्या विभागांची शिफारस लागते. यात बराच कालावधी जातो. वाहनांची संख्या १ लाख गृहीत धरून केलेले नियोजन जर ती संख्या एकदम ५ लाख झाली तर कसे उपयोगी पडेल, असा प्रश्न बोनाला यांनी केला.सल्लागार एजन्सीच्या कामाचे स्वरूप वेगळे असते. मोठ्या प्रकल्पांसाठी सर्व्हे करणे, नकाशे तयार करणे, प्रकल्पबाधितांची माहिती जमा करणे ही कामे करावी लागतात. महापालिकेने ही कामे केली तर त्याला बराच काळ लागेल. सल्लागार संस्था ही कामे लगेच करतात, त्यामुळे त्यांची नियुक्ती करावी लागते. त्याला अवास्तव खर्च म्हणता येणार नाही. या कंपन्याही कोणा एकाच्या नाही तर संयुक्त मान्यतेने निश्चित केल्या जातात, असे बोनाला म्हणाले.