शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Gandhi : "माझ्या भावाला राजपुत्र म्हणतात...; नरेंद्र मोदी हे सम्राट, महालात राहतात", प्रियंका गांधी कडाडल्या
2
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
3
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
4
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
5
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
6
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
7
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
8
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
9
सलमान खान फायरिंग प्रकरणात आत्महत्या करणाऱ्या आरोपीच्या कुटुंबाची मुंबई उच्च न्यायालयात धाव, सीबीआय चौकशीची मागणी
10
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
11
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
12
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
13
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली
14
शुबमनने हरलीनला दिले क्रिकेटचे धडे; महिला क्रिकेटपटूसाठी गिल बनला कोच, Video
15
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं
16
Income Tax नियमांमध्ये बदल होणार आहेत का? शेअर बाजारही आपटला; अर्थमंत्र्यांनी दिली प्रतिक्रिया
17
T20 World Cup साठी अमेरिकेचा संघ जाहीर; भारताच्या विश्वविजेत्या कर्णधाराला डच्चू
18
एल्विश यादव पुन्हा अडचणीत! सापाचं विष प्रकरणानंतर आता मनी लॉड्रिंग केस, ED करणार चौकशी
19
Ravi Pradosh 2024: कोर्ट कचेऱ्या आणि कौटुंबिक वादातून सुटका मिळावी म्हणून करा रवी प्रदोष व्रत!
20
केंब्रिजमधून M. Phil, राहण्यासाठी घर नाही, स्वत:ची कारही नाही, एवढी आहे राहुल गांधींची संपत्ती 

भोसरीत बांधकाम व्यावसायिकाची अडीच कोटींची फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2019 7:26 PM

बांधकाम साईटवर असलेले सिमेंट आणि स्टील स्वत:च्या फायद्यासाठी वापरले...

ठळक मुद्देभोसरी येथील दुय्यम निबंधक कार्यालयातील प्रकार

पिंपरी :  करारनामा झालेला असताना बनावट विकसन करारनामा तयार केला. त्यातून बांधकाम व्यावसायिकाची अडीच कोटी रुपयांची फसवणूक केली. तसेच बांधकाम साईटवर असलेले सिमेंट आणि स्टील स्वत:च्या फायद्यासाठी वापरले. हा प्रकार भोसरी येथील दुय्यम निबंधक कार्यालयात झाला आहे. याप्रकरणी विजय वामन येळवंडे (वय ३९, रा. निघोजे, ता. खेड, पुणे) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, आतिष मोहन भालसिंग (रा. गहुंजे, देहूरोड), ओमप्रकाश एल भाटिया (रा. रावेत), कमलेश श्यामलाल बठीजा (रा. चतु:शृंगी), गिरीधर अंकुशराव गायकवाड (रा. भोसरी), सागर भीमराव परामणे (रा. वाल्हेकरवाडी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विजय रियल इस्टेट आणि ट्रान्सपोर्टचा व्यवसाय करतात. २०१२ साली त्यांनी गोधन प्रॉपर्टीज नावाने फार्म स्थापन केली. त्या फार्ममध्ये आरोपी कमलेश, गिरीधर आणि सागर भागीदार होते. विजय यांनी आरोपी ओमप्रकाश यांच्याकडून रावेत येथील सुमारे पाच गुंठे जमिनीचे कधीही रद्द न होणारे कुलमुखत्यारपत्र करून घेतले.   विजय आणि ओमप्रकाश यांच्यामध्ये विकसन करारनामा झालेला असताना आरोपींनी पुन्हा दुसरा बनावट विकसन करारनामा व कुलमुखत्यारपत्र केले. तसेच आरोपी आतिष यांनी विजय यांच्यासोबत भाडेकरार झालेला असताना विजय यांच्या परस्पर दुसºया इसमांसोबत भाडेकरार केला. गोधन प्रॉपर्टीजमध्ये बेकायदेशीररीत्या भाडेकरू ठेवले. तसेच विजय यांना जीवे मारण्याची धमकी दिली. आरोपींनी विजय यांची सुमारे २ कोटी ५० लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केली. तसेच ४ लाख ५० हजार रुपयांचे सिमेंट, स्टील मटेरियल आरोपींनी स्वत:च्या फायद्यासाठी वापरून त्याचा अपहार केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

टॅग्स :bhosariभोसरीfraudधोकेबाजीCrime Newsगुन्हेगारीbusinessव्यवसाय