पिंपरी : गॅस कटरने एटीएम कापून चोरट्यांनी दीड लाखांची रोकड लंपास केली. ही घटना पिंपरीतील संत तुकारामनगर परिसरात शनिवारी सकाळी उघडकीस आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संत तुकारामनगर पिंपरी येथे डॉ. डी. वाय. पाटील कॉलेजच्या समोर अॅक्सिस बँकेचे एटीएम आहे. शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी गॅस कटरच्या साह्याने एटीएम कापून त्यातील दीड लाखाची रोकड चोरून नेली. पिंपरी पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत. गॅस कटरचा वापर करून भर लोकवस्तीतील एटीएम फोडल्याने खळबळ उडाली आहे.
एटीएम फोडून दीड लाखाची रोकड लंपास
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2018 15:26 IST