धक्कादायक! चिंचवडमध्ये १६ वर्षीय मुलाने केला साडेचार वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2022 16:44 IST2022-05-18T15:34:27+5:302022-05-18T16:44:50+5:30
सकाळी नऊ ते सायंकाळी साडेपाच या कालावधीतील घटना

धक्कादायक! चिंचवडमध्ये १६ वर्षीय मुलाने केला साडेचार वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार
पिंपरी : साडेचार वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार केला. याप्रकरणी १६ वर्षीय अल्पवयीन मुलाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. वाल्हेकरवाडी, चिंचवड येथे सोमवारी (दि. १६) सकाळी नऊ ते सायंकाळी साडेपाच या कालावधीत ही घटना घडली.
पीडित अल्पवयीन मुलीच्या आईने याप्रकरणी मंगळवारी (दि. १७) चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला घराबाहेर गेली असता त्यांची साडेचार वर्षांची मुलगी आणि मुलगा घरी होते. त्यावेळी अल्पवयीन १६ वर्षीय मुलगा फिर्यादीच्या घरी आला.
त्यानंतर अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केले. फिर्यादी महिला घरी आल्यानंतर पीडित मुलीला त्रास होत असल्याचे त्यांना दिसून आले. त्यामुळे फिर्यादीने मुलीला विचारले असता, लैंगिक अत्याचाराचा प्रकार समोर आला. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.