शांततेचा भंग केल्याप्रकरणी माजी नगरसेवकासह १५ जणांवर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2019 19:44 IST2019-03-24T19:44:15+5:302019-03-24T19:44:44+5:30
बेकायदेशीर जमाव जमवित फटाके वाजवून सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी माजी नगरसेवकासह १५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शांततेचा भंग केल्याप्रकरणी माजी नगरसेवकासह १५ जणांवर गुन्हा दाखल
पिंपरी : बेकायदेशीर जमाव जमवित फटाके वाजवून सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी माजी नगरसेवकासह १५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार शुक्रवारी रात्री साडेसहाच्या सुमारास वाकड येथे घडला.
धनराज बिरदा (रा. प्रथम सोसायटी, वाकड) असे माजी नगरसेवकाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पोलीस आयुक्तांनी जमाव बंदीचे आदेश दिलेले आहेत. दरम्यान, पिंपरी-चिंचवड महापालिकेचे माजी नगरसेवक धनराज बिरदा यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुक्रवारी रात्री साडेदहाच्या सुुमारास वाकड येथील प्रथम सोसायटीतील अंतर्गत रस्त्यावर बेकायदा जमाव जमविला. मोठमोठ्याने फटाके वाजवून शांततेचा भंग केला. दरम्यान, याप्रकरणी बिरदा यांच्यासह १५ जणांवर वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.