लोणावळा : लोणावळा शहरातील बंद घरे व बंगले यांची टेहाळणी करुन घरफोड्या करणाऱ्या अट्टल चोरट्याला लोणावळा शहर पोलीस व पुणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने संयुक्त कारवाई करत अटक केली. त्याच्याकडून १५ घरफोड्या उघडकीस आल्या असून १५ लाख ४० हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. वसिम रुबाबअली शेख (वय २२, रा. इंदिरानगर, लोणावळा) असे या अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याला २४ तारखेपर्यत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुणे ग्रामीणचे अपर पोलीस अधिक्षक संदीप जाधव यांनी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात पत्रकार परिषद घेत या गुन्ह्याची माहिती दिली. यावेळी लोणावळा उपविभागाचे पोलीस उपअधिक्षक ज्ञानेश्वर शिवथरे, लोणावळा शहरचे पोलीस निरीक्षक भगवानराव पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक खुने व तपास पथक उपस्थित होते.
लोणावळ्यात १५ घरफोड्या करणारा आरोपी गजाआड ; १५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2018 17:12 IST
लोणावळा शहरातील बंद घरे व बंगले यांची टेहाळणी करुन घरफोड्या करणाऱ्या अट्टल चोरट्याला लोणावळा शहर पोलीस व पुणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने संयुक्त कारवाई करत अटक केली.
लोणावळ्यात १५ घरफोड्या करणारा आरोपी गजाआड ; १५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
ठळक मुद्देआरोपीचे अजुन तीन साथीदार आरोपी फरार