शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

कामगाराला बोलण्यात गुंतवून दुकानातून १४ हजारांची रोकड पळवली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 06, 2021 6:47 PM

पिंपरीच्या हिंजवडीतील घटना, तीन अनोळखी चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल

पिंपरी : दुकान बंद करत असताना कामगाराला एका अनोळखी व्यक्तीने बोलण्यात गुंतवले. त्यानंतर त्याच्यासोबत असलेल्या दोघांनी दुकानातून १४ हजारांची रोख रक्कम चोरून नेली. ही घटना सोमवारी दुपारी सव्वाचार वाजताच्या सुमारास सुसगाव येथे घडली.

कालिदास वसंत करचे (वय ३३, रा. नांदे, ता. मुळशी) यांनी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तीन अनोळखी चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, करचे यांचे सुसगावमध्ये एचपी पेट्रोल पंपासमोर कृष्णा पेंट्स नावाचे हार्डवेअर व पेंटिंग सामानाचे दुकान आहे. त्यांच्या  दुकानातील कामगार जितेंद्र जोगिंदर सिंग हा सोमवारी दुपारी सव्वाचार वाजताच्या सुमारास दुकान बंद करत होता. त्यावेळी एक अनोळखी माणसाने कामगाराला बाहेर बोलावले. त्या इसमाने कामगाराला त्याच्यासोबत बोलण्यात गुंतवले. त्यावेळी त्याच्यासोबत असलेल्या दोघांनी करचे यांच्या दुकानात उघड्या दरवाजातून प्रवेश केला. दुकानाच्या ड्रॉवर मधील १४ हजार रुपयांची रोख रक्कम चोरट्यांनी चोरून नेली.

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीArrestअटक