तरुणाकडून १२ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2020 15:05 IST2020-03-15T15:04:33+5:302020-03-15T15:05:46+5:30

अल्पवयीन मुलीला फूस लावून लैंगिक अत्याचार करणाऱ्या तरुणाला पाेलिसांनी अटक केली.

12 year old girl sexually assaulted by young man rsg | तरुणाकडून १२ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार

तरुणाकडून १२ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार

पिंपरी : अल्पवयीन मुलीशी ओळख करून तिला फूस लावून पळवून नेले. त्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. चिंचवड येथे शुक्रवारी (दि. १३) सायंकाळी सहाच्या सुमारास हा प्रकार घडला. याप्रकरणी एका तरुणाला अटक करण्यात आली आहे.

पीडित १२ वर्षीय मुलीच्या ३२ वर्षीय आईने याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तर आदित्य युवराज पवार (वय १९, रा. चिंचवड) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी याने पीडित मुलीशी ओळख निर्माण केली. तसेच तिला फूस लावून पळवून नेऊन तिच्यावर दोन ते तीन वेळा लैंगिक अत्याचार केला.

याप्रकरणी पीडित अल्पवयीन मुलीच्या आईने पोलिसांकडे धाव घेतल्यानंतर आरोपीला ताब्यात घेण्यात आले. गुन्हा दाखल करून त्याला पोलिसांनी अटक केली. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

Web Title: 12 year old girl sexually assaulted by young man rsg