जुगार अड्यावर छापा; ११ जणांना अटक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2019 16:24 IST2019-12-17T16:22:10+5:302019-12-17T16:24:37+5:30

देहूफाटा-आळंदी येथे काहीजण तीन पत्ती जुगार खेळत असल्याची पोलिसांना माहिती

11 person arrested in raid of gambling case | जुगार अड्यावर छापा; ११ जणांना अटक 

जुगार अड्यावर छापा; ११ जणांना अटक 

पिंपरी : जुगार अड्ड्यावर छापा टाकून दिघीपोलिसांनी ११ जुगाऱ्यांना अटक केली आहे. त्याठिकाणाहून सुमारे ४३ हजार ७७० रुपये जप्त केले आहे. शनिवारी सायंकाळी ही कारवाई केली आहे.
दिघीपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोपाळ साहेबराव तापकीर (वय ४५, रा. चºहोली) दत्तात्रय अबाजी राजगुरु (वय ४८ रा. राजगुरुनगर), भगवान रोहिदास कांबळे (वय ४२, रा. अंबरनाथ, ठाणे) सलीम उस्मान शेख (वय ४५ रा. नाणेकरवाडी, चाकण), प्रमोद धर्मराज शेंडे (वय ४४, रा. टिंगरेनगर, विश्रांतवाडी), बळीराम माणिक गालफाडे (वय ६०, रा. लांडेवाडी, भोसरी) हिरामण गंगाराम राठोड (वय ४२), सोमनाथ टिकाराम राठोड (वय ४२, दोघेही रा. लोहगाव, पुणे) अशोक ज्ञानोबा साकरुडकर (वय ३६, रा. केळगाव, आळंदी) विजय अण्णासाहेब रासवे (वय ३१, रा. देहुफाटा आळंदी), सोमनाथ बब्रुवान वजरकर (वय ३५, रा. आदर्शनगर, दिघी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील काळेवाडी झोपडपट्टीच्या मागे, देहूफाटा-आळंदी येथे काहीजण तीन पत्ती जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्याठिकाणी छापा टाकुन अकरा जणांना अटक केली. त्यांच्याकडून सुमारे ४३ हजार ७७० रुपये व जुगाराचे साहित्य हस्तगत केला आहे.

Web Title: 11 person arrested in raid of gambling case