डहाणूत विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी बोट समुद्रात बुडाली
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2018 14:54 IST2018-01-13T14:24:20+5:302018-01-13T14:54:33+5:30

डहाणू येथे समुद्रात बोट उलटून मोठी दुर्घटना घडली आहे. बोटमध्ये एकूण 40 विद्यार्थी होते.
32 विद्यार्थ्यांना वाचवण्यात यश मिळालं असून सात विद्यार्थ्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.
हे सर्व विद्यार्थी के एल पोंडा हायस्कूलचे असल्याची माहिती मिळाली आहे. सर्वजण 11 वी आणि 12 वीचे विद्यार्थी होते.
पिकनिकसाठी हे विद्यार्थी समुद्रात गेले असताना बोट उलटून दुर्घटना घडल्याचं कळत आहे.
2 नॉटिकल अंतरावर ही बोट बुडल्याची माहिती आहे. नेमकी बोट कशामुळे उलटली हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.