ना हिमाचल, ना उत्तराखंड; 'या' राज्यात आहेत सर्वात सुंदर हिल स्टेशन्स, सृष्टीसौंदर्य पाहातच रहाल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2021 07:29 PM2021-12-10T19:29:27+5:302021-12-10T19:38:36+5:30

जेव्हा हिल स्टेशनचा विचार केला जातो. तेव्हा लोक सहसा हिमाचल प्रदेश किंवा उत्तराखंडचे नाव घेतात. मात्र, तुम्हाला हे माहीती आहे का? की, झारखंडमध्येही काही खास हिल स्‍टेशन आहेत. ज्याठिकाणी आपण फिरण्यासाठी जाऊ शकतो.

घाटशिला टेकडी निसर्गप्रेमींसाठी एक खास ठिकाण आहे. येथे तुम्ही शांत आणि निवांत वेळ घालू शकता. एकदा येथे अवश्य भेट द्या.

नेतरहाट हिल स्टेशन झारखंडची राजधानी रांचीपासून १५० किमी अंतरावर आहे. येथील नैसर्गिक सौंदर्य तुम्हाला बघायला मिळेल.

गिरिडीह हिल स्टेशन हे झारखंडचे प्रसिद्ध हिल स्टेशन देखील आहे. येथील घनदाट जंगल आणि महुआची झाडे तुम्हाला बघायला मिळतील.

दलमा हिल झारखंड आणि बंगालच्या सीमेवर आहे. येथे ५० टक्क्यांहून अधिक घनदाट जंगल आहे. याठिकाणी एकदा नक्की भेट द्या. T