फिरण्याची आवड असेल तर बकेट लिस्टमध्ये नक्की अ‍ॅड करा WARचे शूटिंग लोकेशन्स

By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2019 12:32 PM2019-10-06T12:32:01+5:302019-10-06T12:46:02+5:30

बॉलिवूड चित्रपट 'वॉर' बॉक्‍स ऑफिस धुमाकूळ घालत आहे. रिलिज झाल्यापासूनच हा चित्रपट अनेक नवनवे रेकॉर्ड करत असून समिक्षकांसोबतच प्रेक्षकही या चित्रपटाला पसंती देत आहे. चित्रपटामध्ये अॅक्शन, स्टाइल यांची मेजवाणी प्रेक्षकांना अनुभवायला मिळतेच पण त्याचसोबत शुटिंग लोकेशन्सही भारी आहेत. देश-विदेशातील वेगवेगळ्या ठिकाणी या चित्रपटाचं चित्रिकरण करण्यात आलं आहे. यापैकी काही निवडत ठिकाणांबाबत आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. जर तुम्ही फिरण्यासाठी क्रेझी असाल तर तुमच्या बकेट लिस्टमध्ये या ठिकाणांचा समावेश नक्की करा.

पोर्तू हे पोर्तुगाल देशातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर व युनेस्कोचे जागतिक वारसा स्थान आहे. हे प्राचीन शहर दूरो नदीच्या मुखाशी वसलेले आहे. हे शहर फार सुंदर आहे. येथे अनेक पर्यटक फिरण्यासाठी येत असतात. याच ठिकाणी चित्रपटातील हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफ यांचा एक इंटेंस, हाय-स्पीड सिक्वेंस शुट करण्यात आला आहे. (Image Credit : limelight.ie)

आर्क्टिक हा पृथ्वीच्या उत्तर ध्रुवाभोवतालचा एक भौगोलिक प्रदेश आहे. वॉर चित्रपटातील सर्वात शेवटचा आणि महत्त्वाचा अॅक्शन सिक्वेन्स येथे शूट करण्यात आला आहे. हा पहिला असा चित्रपट आहे ज्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर अॅक्शन सिन्सची मेजवाणी प्रेक्षकांसाठी देण्यात आली आहे. दरम्यान, आर्क्टिक सर्कल हे पृथ्वीवरील सर्वात थंड ठिकाणांपैकी एक मानलं जातं. जर तुम्ही येथे फिरण्यासाठी जाण्याचा विचार करत असाल तर हा अनुभव तुमच्यासाठी खरचं फार सुंदर असेल. (Image Credit : Beautiful World Travel Guide)

चित्रपटातील सर्वात महत्त्वाचा चेजिंग सीक्वल येथे शूट करण्यात आला आहे. ऑस्‍ट्रेलिया म्हणजे, जगभरातील सर्वात सुंदर देशांपैकी एक असं मानलं जातं. तसेच ऑस्ट्रेलियातील हा बीच पर्यटकांमध्ये फार प्रसिद्ध आहे. येथे फिरायला जाणं एखाद्या व्हिज्युअल ट्रिटपेक्षा कमी नाही. (Image Credit : Sydney)

वॉर चित्रपटातील प्रसिद्ध गाणं 'घुंघरू' येथे शूट करण्यात आलं आहे. या ठिकाणी शूट करण्यात येणारं हे बॉलिवूडमधील सर्वात पहिलं गाणं आहे. हे जगभरातील सर्वात महत्त्वाच्या लोकेशंसपैकी एक मानलं जातं. इटली लोकांच्या फेवरेट डेस्टिनेशन्सपैकी एक आहे. अशातच जर तुम्ही येथे फिरण्याचा विचार करत असाल तर Positano Beach वर नक्की फिरण्यासाठी जा. (Image Credit : Carla Coulson)

चित्रपटातील काही भाग भारतातील केरळ राज्यात चित्रीत करण्यात आला आहे. केरळला 'देवभूमी' म्हणजेच, 'गॉड्स ओन कंट्री' असं म्हटलं जातं. येथ जगभरातून अनेक पर्यटक फिरण्यासाठी येत असतात. असातच जर तुम्ही एखाद्या शांत आणि निसर्गसौंदर्याने नटलेल्या ठिकाणी फिरायला जाण्याचा विचार करत असाल तर केरळ तुमच्यासाठी बेस्ट पर्याय आहे.