'ही' आहेत जगातील सर्वात सुंदर बस स्थानकं
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2018 15:38 IST2018-07-31T15:23:38+5:302018-07-31T15:38:26+5:30

जगभरातील अनेक सुंदर गोष्टी पाहण्याची इच्छा सर्वांनाच असते. निसर्गरम्य वातावरणातील पर्यटन स्थळं सगळ्यांनाच आकर्षित करतात. मात्र जगात अशी काही बस स्थानकं आहेत जी एअरपोर्टसारखी अप्रतिम आहेत. जगातील ही सर्वात सुंदर बस स्थानकं कोणती ते जाणून घेऊया.
ड्रावा नदीच्या किनाऱ्यावर वसलेले क्रोशिया येथील बसस्थानक हे जगातील सर्वात सुंदर बस स्थानकापैकी एक आहे.
पोर्तुगाल येथील बस स्थानक हे पूर्णपणे काचेचा वापर करून तयार केलेले आहे. अत्याधुनिक सोयींनी सज्ज असलेल्या या बस स्थानकात एकावेळी 96 बस उभ्या राहतात.
जर्मनीचे बस स्थानक हे 1800 स्क्वेअर मीटरच्या पंखासारख्या आकाराच्या छतासाठी प्रसिद्ध आहे.
ब्रिटनमधील स्लो बस स्थानक हे एखाद्या हॉटेलपेक्षाही अत्यंत सुंदर असल्याने सर्वांचंच लक्ष वेधून घेतं.
हॉलंड येथील बस स्थानक हे 2003 साली तयार करण्यात आले असून ते त्याच्या इंटेरिअर डिझाईन करता अत्यंत प्रसिद्ध आहे. सिंथेटिक पॉलिएस्टरचा वापर करून हे अप्रतिम बस स्थानक बांधण्यात आले आहे.
लंडन येथील वॉक्सल हे बस स्थानक पूर्णपणे स्टेनलेस स्टीलने तयार करण्यात आलेले आहे. 2005 साली तयार करण्यात आलेले हे बस स्थानक अत्यंत सुंदर आहे.