छोटा केदारनाथ म्हणून ओळखलं जातं 'हे' मंदिर!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2018 15:31 IST2018-09-30T15:22:25+5:302018-09-30T15:31:29+5:30

उत्तराखंडमधील गढवालच्या रूद्रप्रयाग जिल्ह्यामध्ये तुंगनाथ पर्वत आहे.

हे क्षेत्र गढवालच्या सर्वात सुंदर ठिकाणांपैकी एक आहे.

हे संपूर्ण क्षेत्र पंचकेदार म्हणून ओळखलं जातं.

1000 वर्षांपूर्वी पांडवांनी तुंगनाथ मंदिर बाधलं होतं असं म्हटलं जातं.

या ठिकाणाला भारताचं स्विर्त्झलँड असं म्हटलं जातं.

मे पासून नोव्हेंबरपर्यंत या ठिकाणी फिरण्यासाठी जाता येतं.

जानेवारी - फेब्रुवारीच्या महिन्यामध्ये येथे होणाऱ्या बर्फवृष्टीमुळे येथे जाणं शक्य होत नाही

या पर्वतावर 3680 मीटर उंचावर तुंगनाथ मंदीर उभारण्यात आलं आहे.

तुंगनाथ पर्वताच्या माथ्यावरून वाहत येणाऱ्या जलधारांपासून अक्षकामिनी नदी तयार होते.

















