ब्ल्यू सिटीचे सौंदर्य पाहण्यासाठी 'या' ठिकाणाला नक्की भेट द्या By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2020 5:41 PM
1 / 9 जोधपूर हे राजस्थानमधील दुसरं मोठं शहर आहे. ऐतिहासीक वास्तुंचे पाहण्याचे वेड असलेल्या लोकांसाठी हे ठिकाण खूप खास आहे. 2 / 9 भारतातच नाही तर जगभरात प्रसिध्द असलेले ठिकाण आहे. या शहराला ब्ल्यू सिटी असं सुद्धा म्हणतात. 3 / 9 जोधपूर या ठिकाणी अनेक ऐतिहासिक वास्तु आहेत. जगभरातून मोठ्या संख्येने पर्यटक येत असतात. 4 / 9 जर तुम्ही राजस्थानला फिरायला गेलात तर मेहरानगड, मंडोर गार्डन, राव जोधा डेजर्ट रॉक पार्क, बालसमंद झील, कायलाना झील, घंटाघर या ठिकाणांना नक्की भेट द्या 5 / 9 या ठिकाणापासून काही अंतरावर माऊट आबू हे पर्यटन स्थळ आहे. 6 / 9 निळ्या रंगात असलेल्या या शहराचे सौंदर्य पाहण्यासारखे आहे. 7 / 9 फोटोग्राफीचाी आवड असलेले पर्यटक या ठिकाणी आकर्षक वास्तुंचे फोटो काढू शकतात. 8 / 9 इथल्या वास्तुंबरोबरच खाद्यसंस्कृतीचा आस्वाद घेण्याची मजा काही वेगळीच आहे. 9 / 9 ज्या लोकांना खवय्येगिरीची मजा घेण्याची आवड आहे. असे लोक या ठिकाणी प्रसिध्द असलेल्या गुलाबजामच्या भाजीचा आस्वाद घेऊ शकतात. आणखी वाचा