By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2026 15:17 IST
1 / 8उन्हाळा असो वा पावसाळा, पर्यटकांना नेहमीच खुणावते ते काश्मीरचे 'ट्युलिप गार्डन'. बर्फाच्छादित डोंगर आणि समोर पसरलेला फुलांचा गालिचा कोणाला आवडणार नाही? पण तुम्हाला माहीत आहे का, फुलांची ही किमया पाहण्यासाठी फक्त काश्मीरलाच जायला हवे असे नाही. आपल्या भारतात अशी सात ठिकाणे आहेत, ज्यांच्या सौंदर्यापुढे नेदरलँड्स आणि फ्रान्ससारखे देशही फिके पडतील. विशेष म्हणजे, यात आपल्या महाराष्ट्राचाही अभिमान असलेल्या एका ठिकाणाचा समावेश आहे.2 / 8व्हॅली ऑफ फ्लॉवर्स, उत्तराखंड: हिमालयाच्या कुशीत वसलेली ही दरी 'युनेस्को' जागतिक वारसा स्थळ आहे. जून ते सप्टेंबर दरम्यान येथे शेकडो प्रजातींची फुले उमलतात. ट्रेकिंगची आवड असलेल्या लोकांसाठी हे नंदनवनच आहे.3 / 8युमथांग व्हॅली, सिक्कीम: उत्तर सिक्कीममध्ये ११ हजार फूट उंचीवर असलेली ही दरी 'पूर्वेकडील व्हॅली ऑफ फ्लॉवर्स' म्हणून ओळखली जाते. एप्रिल ते जून दरम्यान येथे रोडोडेंड्रॉन फुलांमुळे संपूर्ण दरी रंगीबेरंगी दिसते.4 / 8कास पठार, महाराष्ट्र : सातारा जिल्ह्यातील कास पठार हे महाराष्ट्राचे वैभव आहे. मान्सूनच्या काळात येथे नैसर्गिकरीत्या उमलणाऱ्या रानफुलांमुळे जमिनीवर रंगांची उधळण पाहायला मिळते. युनेस्कोने याला जैवविविधतेचा वारसा म्हणून घोषित केले आहे.5 / 8जुकू व्हॅली, नागालँड-मणिपूर: ईशान्य भारतातील ही सर्वात सुंदर दरी मानली जाते. पावसाळ्यात येथे 'जुकू लिली' सारखी दुर्मिळ फुले उमलतात, जी पाहण्यासाठी जगभरातून पर्यटक येतात.6 / 8मुन्नार, केरळ : मुन्नारमधील पहाडांवर 'नीलकुरिंजी' नावाचे फूल उमलते. हे फूल तब्बल १२ वर्षांतून एकदाच उमलते. जेव्हा हे फूल उमलते, तेव्हा संपूर्ण डोंगररांगा निळ्या रंगात न्हाऊन निघतात. हा नजारा पाहण्यासाठी लोक वर्षानुवर्षे वाट पाहतात.7 / 8शिलॉन्ग चेरी ब्लॉसम, मेघालय: तुम्हाला जपानला जाण्याची गरज नाही! ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये शिलॉन्गमध्ये चेरी ब्लॉसमची झाडे गुलाबी फुलांनी बहरतात. या काळात येथे मोठा उत्सवही साजरा केला जातो.8 / 8लालबाग बॉटनिकल गार्डन, बेंगळुरू: कर्नाटकच्या राजधानीत असलेल्या या बागेत वर्षातून दोनदा भव्य पुष्पप्रदर्शनाचे आयोजन केले जाते. फुलांपासून बनवलेल्या विविध प्रतिकृती पर्यटकांच्या डोळ्यांचे पारणे फेडतात.