शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Travel : रुपयाची जादू! खिशात फक्त १० हजार घेऊन जा अन् 'या' देशांत लखपती बना

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2026 14:50 IST

1 / 7
जगातील काही देश असे आहेत, जिथे भारतीय रुपयाचं मूल्य तिथल्या चलनापेक्षा कितीतरी पट जास्त आहे. या देशांत पाऊल ठेवताच तुमच्या हातात नोटांची थप्पी येईल आणि एका क्षणासाठी तुम्हाला आपण श्रीमंत झाल्याचा भास होईल. पण थांबा! हे नोटांचे बंडल पाहून हुरळून जाण्यापूर्वी तिथली महागाई आणि चलनाची घसरण समजून घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे.
2 / 7
आर्थिक सुधारणा सुरू असल्या तरी उझबेकिस्तानचं चलन जागतिक स्तरावर अजूनही कमकुवत आहे. १ रुपया साधारण १३० उझबेकिस्तानी सोम आहे. ऐतिहासिक वारसा असलेल्या या देशात भारतीय पर्यटकांना खूप कमी खर्चात राजासारखं फिरता येतं.
3 / 7
बालीसारख्या पर्यटन स्थळांमुळे प्रसिद्ध असलेल्या इंडोनेशिया या देशात भारतीय रुपयाचा चांगला भाव मिळतो. इथे १ रुपया साधारण १८३ इंडोनेशियन रुपिया आहे. इथल्या चलनी नोटांवर अनेक शून्य असतात, त्यामुळे ५-१० हजार रुपये बदलले तरी लाखो रुपये हातात आल्याचं समाधान मिळतं.
4 / 7
कर्जाचा डोंगर आणि संथ आर्थिक विकासामुळे लाओसचं चलन कमकुवत आहे. १ रुपया साधारण २३२ लाओशियन किप आहे. हा आग्नेय आशियातील सुंदर देश असला तरी, रोजच्या खरेदीसाठी तुम्हाला नोटांचे मोठे थप्पी घेऊन फिरावं लागेल.
5 / 7
व्हिएतनामची अर्थव्यवस्था प्रगती करत असली, तरी तिथल्या सरकारचं धोरण चलन कमकुवत ठेवण्याचं आहे जेणेकरून निर्यात वाढेल. १ रुपया साधारण २८४ व्हिएतनामीज डोंग इतका आहे. व्हिएतनाम हे भारतीयांसाठी फिरण्यासाठी सर्वात स्वस्त आणि बजेट-फ्रेंडली ठिकाण मानलं जातं.
6 / 7
कठोर आंतरराष्ट्रीय निर्बंध आणि ढासळत्या व्यापारामुळे सोबतच युद्धजन्य परिस्थितीमुळे इराणचं चलन सर्वात कमकुवत झालं आहे.१ रुपया साधारण १४,३०३ इरानियन रियाल आहे. इथे पर्यटक आपली छोटीशी रक्कम बदलूनही लखपती बनतात. मात्र, स्थानिक लोकांसाठी वाढत्या किमतींनी जगणं मुश्किल केलं आहे.
7 / 7
सध्या लेबनॉनची आर्थिक स्थिती अत्यंत बिकट आहे. राजकीय अस्थिरता आणि हायपरइन्फ्लेशनमुळे इथलं चलन गडगडलं आहे. इथला १ रुपया साधारण ९७०.७१ लेबनीज पाउंड आहे. इथे गेल्यावर तुम्हाला कागदी नोटांची मोठी रद्दीच हाताला लागेल, पण वस्तूंच्या किमती इतक्या वाढल्या आहेत की त्या नोटांची खरेदी क्षमता मात्र कमी आहे.
टॅग्स :tourismपर्यटनIndiaभारत