शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Travel : भारतातील मिनी स्वित्झर्लंड! 'या' निसर्गरम्य ठिकाणी फक्त भारतीयच करू शकतात सफर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2026 16:56 IST

1 / 7
भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. इथले डोंगर-दऱ्या, समुद्रकिनारे आणि ऐतिहासिक स्थळे पाहण्यासाठी जगभरातून पर्यटक येत असतात. सहसा कोणत्याही पर्यटनस्थळावर आपल्याला विदेशी नागरिक फिरताना दिसतातच. मात्र, आपल्याच देशात एक असे ठिकाण आहे, ज्याला 'मिनी स्वित्झर्लंड' म्हटले जाते, पण तिथे कोणत्याही परदेशी नागरिकाला प्रवेश मिळत नाही.
2 / 7
हो, हे ऐकून आश्चर्य वाटेल, पण उत्तराखंडमधील 'चकराता' या निसर्गरम्य हिल स्टेशनवर फक्त भारतीय नागरिकांनाच फिरण्याची मुभा आहे. चकराता या शहराची स्थापना १८६६ मध्ये ब्रिटीशांनीच केली होती. त्यावेळी ईस्ट इंडिया कंपनीचे मोठे अधिकारी उन्हाळ्याच्या सुट्ट्या घालवण्यासाठी या ठिकाणी येत असत. १८६९ मध्ये ब्रिटीश सरकारने हे शहर कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हवाली केले.
3 / 7
सध्या या ठिकाणी भारतीय लष्कराचाअत्यंत महत्त्वाचा आणि गोपनीय तळ आहे. सुरक्षेच्या कारणास्तव आणि लष्करी हालचालींची गोपनीयता राखण्यासाठी केंद्र सरकारने येथे परदेशी नागरिकांच्या प्रवेशावर बंदी घातली आहे. मात्र, भारतीय नागरिक कोणत्याही अडथळ्याशिवाय येथे फिरू शकतात.
4 / 7
चकराता हे ठिकाण निसर्गप्रेमींसाठी नंदनवन आहे. जर तुम्ही चकराताला जाण्याचा प्लॅन करत असाल, तर काही ठिकाणांना भेट दिलीच पाहिजे. चकरातामधील सर्वात लोकप्रिय ठिकाण म्हणजे टायगर फॉल्स. डोंगररांगांमधून कोसळणारा हा धबधबा पाहणे एक अविस्मरणीय अनुभव असतो. शहराच्या गर्दीपासून दूर शांततेत वेळ घालवण्यासाठी हे उत्तम ठिकाण आहे.
5 / 7
चकराता शहरापासून साधारण ३० किमी अंतरावर असलेली बुधेर गुहा ही गुहा ऐतिहासिक महत्त्वाची मानली जाते. ट्रेकिंग आणि हायकिंगची आवड असलेल्या लोकांसाठी हे एक 'मस्ट व्हिजिट' ठिकाण आहे. मित्रांसोबत कॅम्पिंग करण्यासाठी ही जागा प्रसिद्ध आहे.
6 / 7
चिलमिरी नेक हे चकरातामधील सर्वात उंच शिखर आहे. देवदारच्या घनदाट जंगलात वसलेल्या या ठिकाणावरून हिमालयाचे विहंगम दृश्य दिसते. येथील सूर्यास्त पाहण्यासाठी पर्यटक मोठी गर्दी करतात.
7 / 7
उत्तराखंडची राजधानी डेहराडूनपासून चकराता साधारण ८०-९० किमी अंतरावर आहे. टॅक्सी किंवा खाजगी वाहनाने तुम्ही सहज इथे पोहोचू शकता. जर तुम्हाला गर्दीपासून दूर आणि खऱ्या निसर्गाच्या सानिध्यात राहायचे असेल, तर चकराता तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय आहे.
टॅग्स :tourismपर्यटनIndiaभारतTravel Tipsट्रॅव्हल टिप्स