शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Travel : उन्हाळ्याच्या सुट्टीत कोकण खुणावतंय? मग 'या' ५ ठिकाणांना नक्की द्या भेट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2026 13:58 IST

1 / 7
उन्हाळ्याच्या सुट्टीत कोकणचं सौंदर्य काही औरच असतं. थंडगार नारळपाणी, हापूस आंबा आणि अथांग समुद्रकिनारे... हे सगळं अनुभवायचं असेल, तर 'या' ५ ठिकाणांना नक्की भेट द्यायला हवी.
2 / 7
गुहागर (रत्नागिरी) : गुहागर म्हणजे घराघरांच्या मागे गुहा अर्थात बागा. इथले समुद्रकिनारे खूप सुरक्षित मानले जातात. इथल्या 'होम स्टे'मध्ये राहून कोकणी पाहुणचाराचा आनंद घेता येतो. गुहागरमध्ये व्याडेश्वर मंदिर, वेळणेश्वर आणि हेदवी येथील गणेश मंदिर आवर्जून बघा.
3 / 7
वेंगुर्ला (सिंधुदुर्ग) : ज्यांना गर्दीपासून दूर शांत ठिकाणी जायचे आहे, त्यांच्यासाठी वेंगुर्ला उत्तम आहे. येथील सागरेश्वर बीचवरची शुभ्र वाळू आणि सुरुची झाडं मनाला शांतता देतात. वेंगुर्ल्यात गेलात तर वेंगुर्ला लाईट हाऊस, मोचेमाड बीच आणि शिरोडा बीच नक्की बघा.
4 / 7
दापोली (रत्नागिरी) : उन्हाळ्यातही दापोलीचं हवामान सुखद असतं. येथील लांबच लांब समुद्रकिनारे आणि आजूबाजूची दाट झाडी पर्यटकांना आकर्षित करतात. मुरुड बीच, कर्डे बीच आणि सुवर्णदुर्ग किल्ला यांना नक्की भेट द्या.
5 / 7
तारकर्ली (सिंधुदुर्ग) : जर तुम्हाला स्कुबा डायव्हिंग किंवा वॉटर स्पोर्ट्सची आवड असेल, तर तारकर्लीला पर्याय नाही. इथलं पाणी इतकं स्वच्छ आहे की खालची जमीन स्पष्ट दिसते. तारकर्ली बीच, देवबागचा संगम आणि बॅकवॉटर राईड यांचा अनुभव नक्की घ्या.
6 / 7
गणपतीपुळे (रत्नागिरी) : गणपतीपुळे हे केवळ धार्मिक स्थळ नसून एक अत्यंत सुंदर समुद्रकिनारा आहे. इथलं मंदिर थेट समुद्राच्या वाळूत आहे. या ठिकाणी स्वयंभू गणेश मंदिर, मालगुंड (कवी केशवसुतांचे स्मारक) आणि प्राचीन कोकण संग्रहालय पाहण्यासारखे आहे.
7 / 7
कोकणात जाताना सुती कपडे, सनग्लासेस आणि सनस्क्रीन सोबत ठेवायला विसरू नका. तसेच कोकणी जेवणाचा (उकडीचे मोदक, सोलकढी आणि मासे) आस्वाद नक्की घ्या!
टॅग्स :tourismपर्यटनkonkanकोकण