शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

देशातील १० Planetariums जिथे तुम्ही करू शकता अंतराळाचा रोमांचक प्रवास!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2019 12:57 PM

1 / 11
शाळा आणि कॉलेजमध्ये अनेकदा विद्यार्थ्यांना तारांगण म्हणजेच Planetarium मध्ये घेऊन जातात. इथे जाऊन त्यांना अंतराळातील अनेक रोमांचक गोष्टी दाखवल्या आणि सांगितल्या जातात. इथे जाऊन तुम्ही अंतराळाची एकप्रकारे सफरच करून येता. जगभरातील सगळ्याच लोकांना अंतराळाबाबत जाणून घेण्याची उत्सुकता असते. तुम्हालाही पुन्हा एकदा अंतराळाची सैर करायची असेल तुम्ही देशातील या १० Planetarium ला भेट देऊ शकता.
2 / 11
१) बिरला Planetarium - हे Planetarium कोलकातामध्ये आहे. हे जगातलं आणि आशियातील दुसरं सर्वात मोठं Planetarium आहे. याची इमारत स्तूपाच्या आकारात तयार करण्यात आली आहे. इथे टेलिस्कोप, खगोल शास्त्र इत्यादी व्यवस्था आहेत.
3 / 11
२) नेहरू Planetarium - हे मुंबईतील एक प्रसिद्घ Planetarium आहे. विद्यार्थ्य़ांना इथे खगोल शास्त्रासंबंधी वेगवेगळी माहिती घेता येईल.
4 / 11
३) बिरला Planetarium- चेन्नईमधील हे Planetarium भारतातील मॉडर्न Planetarium पैकी एक आहे. इथे 360-degree Sky Theatre तयार करण्यात आलं आहे. हे भारतातील पहिलं स्पेशल इफेक्ट असलेलं थिएटर आहे.
5 / 11
४) अहमदाबाद Planetarium- गुजरातच्या सायन्स सिटीमध्ये असलेलं हे Planetarium विज्ञानाच्या अनेक गोष्टींना उकलून सांगतं. इथे पृथ्वी, हॉल ऑफ स्पेस आणि एनर्जी पार्कही आहे.
6 / 11
५) पटना Planetarium - येथील इंदिरा गांधी विज्ञान परिसरात तयार केलेलं हे Planetarium आशियातील आणि भारतातील सर्वात मोठ्या Planetarium पैकी एक आहे. इथे तुम्हाला अंतराळासंबंधी अनेक फिल्म्स बघायला मिळतील.
7 / 11
६) कुसुमबाई मोतीचंद Planetarium - पुणे शहरातील या Planetarium च्या नावे आशियातील पहिल्या Projection Planetarium चा किताब आहे. १९५४ मध्ये तयार झालेलं हे Planetarium देशातील सर्वात जुनं Planetarium आहे.
8 / 11
७) प्रियदर्शनी Planetarium - हे तिरूवनंतपुरमच्या Science and Technology Museum मध्ये तयार करण्यात आलं आहे. इथे तुम्ही Night Sky Observation आणि Mobile Astronomy बाबत जाणून घेऊ शकता.
9 / 11
८) गुवाहाटी Planetarium - आसाममधील या Planetarium मध्ये उत्तर-पूर्व भारतातील लोकांसाठी नियमितपणे सेमिनार आणि प्रदर्शनांचं आयोजन केलं जातं. या Planetarium मध्ये Hybrid Planetarium Projection System आहे.
10 / 11
९) स्वामी विवेकानंद Planetarium - मंगलोरमधील हे Planetarium देशातील पहिलं 3D Planetarium आहे. इथे 8K Digital आणि Opto-mechanical Projection System लावण्यात आलं आहे.
11 / 11
१०) अन्ना विज्ञान केंद्र - तामिळनाडूच्या तिरुचिरापल्लीमधील या Planetarium मध्ये टेलिस्कोप लावण्यात आले आहेत. इथे लोक रात्री चंद्र आणि ताऱ्यांना पाहण्यासाठी गर्दी करतात.
टॅग्स :Travel Tipsट्रॅव्हल टिप्सtourismपर्यटन