भारताचा पासपोर्ट पाहिला असेलच; आता जगभरातील पासपोर्टबाबत जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2019 01:27 PM2019-05-14T13:27:10+5:302019-05-14T13:34:25+5:30

परदेशात प्रवास करण्यासाठी पासपोर्टचा वापर केला जातो. नेपाळ आणि भूतान सोडलं तर कोणत्याही देशात जाण्यासाठी पासपोर्ट हा महत्त्वाचा असतो. मात्र पासपोर्टचा रंग हा वेगवेगळा असतो. या रंगाविषयी जाणून घेऊया.

काही देशांमध्ये कम्यूनिस्ट सरकार आहे त्या ठिकाणी पासपोर्टचा रंग हा लाल अथवा मरून असतो. चीन, रशिया, सर्बिया, लात्विया, रोमानिया, पोलंड आणि जॉर्जिया या देशांच्या पासपोर्टचा रंग लाल आहे. तसेच एनडीएन कम्यूनिटीचे देश म्हणजेच बोलिविया, कोलंबिया, एक्वॉडोर आणि पेरू या देशांच्या पासपोर्टचा रंग लाल आहे.

इस्लामिक देशातील पासपोर्टचा रंग हा हिरवा असतो. तसेच बुर्किना फासो, नायजेरिया, नायजर, आयवरी कोस्ट आणि सेनेगल यासारख्या आफ्रीकी देशांच्या पासपोर्टचा रंग हा हिरवा असतो.

निळ्या रंगाचा पासपोर्ट हा अनेक प्रजासत्ताक देशांनी स्वीकारला आहे. तसेच 15 कॅरेबियाई देशांचा पासपोर्टही निळा आहे. दक्षिण अमेरिकेतील ब्राझील, अर्जेंटीना आणि पॅराग्वे देशांचा पासपोर्टही निळ्या रंगाचा आहे.

अंगोला, कॉन्गो, मलावी, बोत्सवाना, जांबिया, बुरुंडी या देशाच्या पासपोर्टचा रंग हा काळा आहे. तसेच न्यूझीलंडच्या पासपोर्टचा रंग देखील काळा आहे.

भारतात निळा, पांढरा आणि मरून या तीन रंगाचे पासपोर्ट आहेत.