देशातील काही रोमँटिक ठिकाणं

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2019 16:22 IST2019-01-28T16:13:27+5:302019-01-28T16:22:44+5:30

पिंक सिटी जयपूरमधील सुजन राजमहल ही जागा सर्वात रोमँटिक असल्याचे म्हटले जाते.

उदयपूर येथील ओबेरॉय उदयविलास हे स्थळ लोकप्रिय आहे. याठिकाणी पर्यटक येतात.

अंदमान-निकोबार येथील जलाकरा हे बेट रोमान्स करण्यासाठी चाहत्यांच्या पसंतीस पडत आहे.

केरळमध्ये अनेक रोमँटिक ठिकाणं अतिशय सुंदर आहेत. येथील अॅलेपी खूप छान ठिकाण आहे. बॅकवॉटर, हाऊसबोट आणि कालव्यांमुळे या परिसराच्या सौंदर्यात भर पडली आहे.

उत्तराखंडमधील चमोलीमध्ये वसलेल्या ऑली या ठिकाणाला दरवर्षी लाखो पर्यटक भेट देतात. यामध्ये नवदाम्पत्यांचं प्रमाण सर्वाधिक आहे. स्किईंग करण्यासाठी हे ठिकाण सर्वोत्तम आहे.

जसलमेर या शहराला प्रचंड मोठा इतिहास आहे. शेकडो वर्षांच्या प्रथा-परंपरा या शहरानं आजही जपल्या आहेत. थार वाळवंटातील मुक्काम, उंटांवरील प्रवास, अनेक ऐतिहासिक आणि सुंदर राजवाडे यांच्यामुळे जसलमेर शहराला दिलेली भेट अविस्मरणीय ठरते.

आसाममध्ये असणारं हॅफलाँग हिल स्टेशन कपल्समध्ये अतिशय लोकप्रिय आहे. निसर्गसौंदर्यानं नटलेलं हे ठिकाण डोंगरांच्या कुशीत वसलेलं आहे.