फुकेतमधील 'या' ठिकाणांना अवश्य भेट द्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2018 21:51 IST2018-10-30T21:37:04+5:302018-10-30T21:51:23+5:30

फुकेत थायलँडमधील लोकप्रिय पर्यटनस्थळ आहे. फुकेतसह थायलँडमध्ये फिरण्‍यासाठी बँकाक, पटाया, अयूथया ऐतिहासिक उद्यान, चियांग माई, नखेन पथोम अशी खास स्‍थळे आहेत.

पर्यटकांना फिरण्यासाठी फुकेतमधील फी-फी बेट मस्तच आहे. गो कार्टिंग, बॉलिंग ऐले, डायविंग, सेलिंग यासारखे अनेक गेम्स याठिकाणी आहेत. तसेच, येथे मोठा गोल्फ कोर्स आहे. याशिवाय मोठी सोन्याची बुद्धाची मूर्ती आहे.

फुकेतमधील पटोंग बीच परिसरात असलेल्या बंगला रोडमध्ये अनेक हॉटेल आणि नाइटक्लब्स आहेत. याठिकाणी पर्यटकांना नाइटलाइफचा आनंद घेता येईल.

नेक्कर्ड हिल्स सुद्धा पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. याठिकाणी बुद्धाची सुंदर मूर्ती पाहायला मिळेल. फुकेतमधील नेक्कर्ड हिल्सला मोठ्या प्रमाणात पर्यटक भेट देतात.

फुकेतमधील प्रसिद्ध स्थळांपैकी एक प्रॉमथेप केप आहे. पर्यटकांना जर फोटोग्राफीची आवड असेल तर याठिकाणी अवश्य भेट दिली पाहिजे. प्रॉमथेप केपमध्ये सुर्योदय आणि सुर्यास्त पाहता येतो.