पर्यटकांच्या लिस्टमध्ये टॉपवर असतं नेदरलॅन्ड; का ते बघाच!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2019 14:58 IST2019-05-18T14:52:29+5:302019-05-18T14:58:49+5:30

जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत फक्त आणि फक्त हिरवळ आणि छोटे-छोटे कालवे दिसतात. 20 पेक्षा अधिक नॅशनल पार्क आणि जणू आभाळाला भिडणाऱ्या इमारती आणि वास्तुशिल्पांचे अद्भूत नमुने. हे सर्व काही तुम्हाला पाहायला मिळेल यूरोपमधील नेदरलॅन्ड्समध्ये. या शहराच्या उत्तर-पश्चिमेकडे समुद्र आहे, दक्षिणमध्ये बेल्जिअम आहे आणि पूर्वेकडे जर्मनी आहे. नेदरलॅन्ड्स एवढं सुंदर आहे की, त्याला युरोपमधील स्वर्ग म्हटलं तरिही वावगं ठरणार नाही. त्यामुळे दरवर्षी अनेक पर्यटक येथे फिरण्यासाठी येतात. जाणून घेऊया या सुंदर शहराबाबत, जे नेहमीच पर्यटकांच्या आकर्षणाचं केंद्र असतं.
Amsterdam
नेदरलॅन्ड्सची राजधानी Amsterdam म्हणजे येथील आकर्षणाचे केंद्र होय. येथे अनेक ऐतिहासिक इमारती आहेत. याव्यतिरिक्त याचं वैशिष्ट्य म्हणजे, येथील छोट्या छोट्या गल्या आणि कालवे.
कार फ्री व्हिलेज Giethoorn
नेदरलॅन्ड्समधील सर्वात सुंदर गाव म्हणजे, Giethoorn. या गावाला 'कार फ्री' व्हिलेज असं म्हणतात. या गावामध्ये अनेक कालवे आहे. त्यामुळे येथील लोक छोट्या नावेचा उपयोग करतात. त्यामुळे येथे कोणाकडेच गाडी नाही. म्हणून या व्हिलेजला कार फ्री व्हिलेज असं म्हणतात.
Rijksmuseum मोस्ट विजिटेड म्यूजियम इन द नेदरलॅन्ड्स
हे संग्रहालय नेदरलॅन्ड्समधील सर्वात मोठ आर्ट म्युझिअय आहे. येथे डिस्प्लेमध्ये इतिहास आणि कलेचे 8000 ऑब्जेक्ट्स लावण्यात आलेले आहेत. याव्यतिरिक्त या संग्रहालयाचं एशियन कलेक्शनही लोकांच्या कुतुहलाचं केंद्र आहे. दरम्यान 2013 आणि 2014मध्ये 'मोस्ट विजिटेड म्यूजियम इन द नेदरलॅन्ड्स' असा दर्जा देण्यात आला होता. वर्ष 2013मध्ये 2.2 मिलियन आणि 2014मध्ये 2.47 मिलियन पर्यटकांनी या संग्रहालयाला भेट दिली होती.
महत्वपूर्ण इमारती आणि संग्रहालयांचं माहेरघर Vrijthof
Vrijthof हे घर नेदरलॅन्ड्सच्या शहराचा हिस्स आहे. या जागेचा वापर सार्वजनिक कामांसाठी करण्यात येतो. असं सांगितलं जातं की, ही जागा एका प्राचीन रोम आणि फ्रेंकिश दफनभूमीपासून विकसित करण्यात आलेली आहे. जे सेंट सर्वेटियसच्या कॉलेजिएट चर्चशी संबंधित होतं. हळूहळू 19व्या शतकामध्ये हा शहराचा मुख्य वर्ग होता. आता या शहरामध्ये अनेर महत्त्वाच्य इमारती, संग्रहालय, थिएटर आणि रेस्टॉरंट्स आहेत.
आकर्षक आहे leiden
leiden हे देशातील सुंदर शहरांपैकी एक शहर. हे ठिकाण पाण्यावर स्थित आहे. या ठिकाणावर अनेक लहान कालवे एकत्र येतात. त्यामुळे हे ठिकाण अत्यंत आकर्षक दिसतात.
पवन चक्क्यांसाठी ओळखलं जातं Kinderdijik
Kinderdijik नेदरलॅन्ड्समदील साउथ हॉलंन्ड प्रांतातील एक गाव आहे. या गावाला 18व्या शतकातील पवन चक्क्यांसाठी ओळखलं जातं. येथील जलप्रबंधन नेटवर्कमध्ये 19 मिल्स आणि 3 पंपिंग स्टेशन्स आहेत. तसेच प्ल डाइक आणि जलाशय असून जे पोल्डरमध्ये येणाऱ्या पुरस्थितीवर नियंत्रण ठेवण्याचं काम करतात.
सत्तेची खुर्ची आहे Delft city hall
Delft city hallला नेदरलॅन्ड्समधील सत्तेची सीट असं म्हटलं जातं. येथे सर्व स्थानिक राजनीतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते.
पर्यटकांचं फेवरेट डेस्टिनेशन west frisian islands
उत्तरेकडील डचच्या किनाऱ्यावर असलेलं वाडेन समुदरकिनाऱ्यावर बेटांची एक श्रृंखला आहे. या जागेल पर्यटकांच्या फेवरेट डेस्टिनेशनच्या लिस्टमध्ये सहभागी करण्यात आलेलं आहे. या बेटाच्या आजूबाजूला कार चालवण्याची परवानगी फक्त येथील स्थानिक रहिवाशांना आहे. इतर लोक येथे फक्त सायकलिंगची गंमत अनुभवू शकतात.