'दिल्ली' पाहायला जाताय तर या ठिकाणांना भेटायलाच हवं
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2019 16:38 IST
1 / 5तुम्ही दिल्लीत राहत असाल किंवा दिल्ली फिरायला जाल तर अग्रसेन की बावलीला भेट द्यायलाच हवी. जंतर मंतर जवळच ही बावली आहे. येथे उत्कृष्ट फोटोग्राफी होऊ शकते. 2 / 5 मिर्झा गालिबची हवेली हेही दिल्लीतील प्रेक्षणीय स्थळ आहे. प्रसिद्ध शायर मिर्झा गालिब यांची आठवण करुन देणारी दिल्लीतील ही हवेली 150 वर्षे जुनी आहे.3 / 5दिल्लीतील संजय वन हे पक्षी प्रेमींसाठी नजरानाच आहे. निसर्गसौंदर्य आणि पक्षांची भ्रमंती हे संजन वन या बगिचेतील प्रमुख आकर्षण आहे.4 / 5सतपुला ब्रिज - सतपुला ब्रिज हा सात पर्वतांचा मिळून बनविण्यात आला आहे. सुलतान मोहम्मद शाह तुघलक याने आपल्या संरक्षणासाठी हा पुल बांधला होता. 5 / 5आधम खानचा मकबरा हेही दिल्लीतील पुरातन वास्तुचा उत्तम नमुना आहे. सन 1561 साली या मकबऱ्याचे बांधकाम पूर्ण झाले होते. अकबर बादशहाला हा मकबरा अतिशय प्रिय होता.