First Floating City in the World : Photos: तरंगते शहर! भारताजवळच्या महासागरात उभे राहतेय; शाळा, हॉटेल्स अन् ५००० घरांची वस्ती...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2022 07:15 PM2022-07-25T19:15:24+5:302022-07-25T19:20:23+5:30

First Floating City in the World : तुम्हाला भटकंतीची सवय आहे आणि डोंगर, जंगल, नदी, तीर्थक्षेत्र आदी ठिकाणी फिरून तुम्हाला कंटाळा आला असेल तर थोड थांबा... हिंद महासागरात जगातील पहिलं तरंगतं शहर उभं राहतंय...

First Floating City in the World : तुम्हाला भटकंतीची सवय आहे आणि डोंगर, जंगल, नदी, तीर्थक्षेत्र आदी ठिकाणी फिरून तुम्हाला कंटाळा आला असेल तर थोड थांबा... हिंद महासागरात जगातील पहिलं तरंगतं शहर उभं राहतंय... या शहरात शाळा, हॉटेल्स , रेस्ट्रॉरंट, प्ले ग्राऊंड आदी सर्व सोयी सुविधा आहेत.

मालदिव येथे हे तरंगत शहर ( First Floating City in the World ) तयार होतंय... ५००० घरांचं हे शहर असणार आहे आणि mainland Male येथून १५ मिनिटांचा बोटीचा प्रवास तुम्हाला करावा लागणार आहे. ५०० एकरवर पसरलेल्या या शहरात तुम्हाला सर्व सोयीसुविधा मिळतील.

पर्यटकांना येथे residence permit घेऊन घर खरेदी करता येऊ शकते.. जवळपास २० हजार लोकं या शहरात राहू शकतात. येथे शाळाही असणार आहे, त्यामुळे कुटुंबियांसह येथे सेटल होण्याचा पर्यायाचा विचारही केला जाऊ शकतो.

या शहरात तुम्हाला कार घेऊन जाता येणार नाही. तुम्हाला बग्गीज किंवा बाईकने प्रवास करावा लागेल. येथील रस्ते सफेद वाळूपासून तयार करण्यात आले आहेत. ते रस्ता एकमेकांना जोडले गेल्याने वाहून जाण्याची चिंता करू नका.

जानेवारी २०२३मध्ये याचं काम सुरू होणार असून हा संपूर्ण प्रकल्प पूर्ण होण्यास किमान पाच वर्षांचा कालावधी लागणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.