फार सुंदर आहेत भारतातील 'ही' 4 ऑफबीट डेस्टिनेशन्स; नक्की भेट द्या

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2019 12:31 PM2019-09-19T12:31:52+5:302019-09-19T12:37:51+5:30

भारत विविधतेने नटलेला देश आहे, हे आपण सारेच जाणतो. तसेच पर्यटनासाठीही भारतात अनेक विविध ठिकाणं आहे. त्यामुळेच दरवर्षी अनेक पर्यटक येथे येत असतात. परंतु, अनेकदा असं दिसून येतं की, अनेक पर्यटक फक्त प्रसिद्ध असलेल्या ठिकाणांना भेट देतात. परंतु, या ठिकाणांव्यतिरिक्त अनेक अशी ठिकाण आहेत जी आपल्या अद्भूत निसर्गसौंदर्यासाठी ओळखली जातात. आज आम्ही तुम्हाला अशाच भारतातील सुंदर ऑफिबीट डेस्टिनेशन्सबाबत सांगणार आहोत. जाणून घेऊया हटके ठिकाणांबाबत...

लोकटाक हे भारताच्या मणिपूर राज्यातील एक गोड्या पाण्याचे सरोवर आहे. मणिपूरच्या दक्षिण भागात इम्फालच्या ४० किमी दक्षिणेस स्थित असलेले हे सरोवर भारतामधील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर आहे. ह्या सरोवराचे वैशिठ्य म्हणजे येथील तरंगती बेटे. अशाच एका ४० चौरस किमी क्षेत्रफळ असलेल्या मोठ्या तरंगत्या बेटावर असलेले येथील कैबुल लामजो राष्ट्रीय उद्यान हे जगातील एकमेव तरंगते राष्ट्रीय उद्यान आहे. संगई नावाचे दुर्मिळ हरीण केवळ येथेच सापडते.

भारताच्या पूर्व तटावर स्थित असलेल्या बोर्रा गुहा विशाखापट्टनम जिल्ह्यामध्ये डोंगरांमध्ये आहेत. येथे फिरण्यासाठी तुम्हाला 2 ते 3 तांसांचा वेळा लागेल.

होजनक्कल वाटरफॉल म्हणजे, निसर्गसौंदर्याचं उत्तम उदाहरण. हा धबधबा तमिळनाडूच्या धर्मपुरी जिल्ह्यामध्ये कावेरी नदीजवळ आहे. येथे तुम्ही कधीही जाऊ शकता.

एलिफन्ट बीच म्हणजे, अंदमान-निकोबारमधील आणखी एक आकर्षणाचं केंद्र. तसेच येथे तुम्ही इतरही सुंदर ठिकाणी फिरू शकता.