ज्वालामुखीपासून तयार झालेला 'हा' तलाव खरचं अद्भूत आहे!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2019 07:13 PM2019-03-01T19:13:13+5:302019-03-01T19:15:57+5:30

आइसलॅन्डमध्ये असलेल्या क्रेटर लेकला तेथील स्थानिक लोक विटी लेक असंही म्हणतात.

विटीचा अर्थ होतो नरक. जुन्या काळातील काही व्यक्तींचं असं म्हणनं असायचं की, नरक हा ज्वालामुखीच्या आतमध्ये असतो.

खरं तर आइसलॅन्डमध्ये असलेल्या या भागामध्ये अनेक क्रेटर असून हा तलाव या सर्व तलावांपैकी एक आहे.

या तलावाचा व्यास 300 मीटरपेक्षा अधिक असून हा तलाव 1724मध्ये ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे तयार झाली होती.

दरम्यान या तलावापर्यंत पोहोचण्यासाठी फार कठिण प्रवास करावा लागत असून फक्त काही महिन्यांमध्येच येथे पोहोचणं शक्य होतं.

या भागांमध्ये फक्त 450 मिमी पाऊस पडतो. अपोलो मिशनदरम्यान चंद्रावर पाठविण्यात आलेल्या अंतराळवीरांना येथेच भू-विज्ञानाची ट्रेनिंग दिली होती. या भागामध्ये आजही ज्वालामुखींचा उद्रेक होत असतात.

2010मध्ये वॉल्कॅनो एक्सपर्ट हजेल यांना येथे भूकंपाची जाणीव झाली होती. जी येथे असणाऱ्या ज्वालामुखींमुळे होती.

याव्यतिरिक्त एप्रिल 2012मध्ये या तलावातील बऱ्फ पूर्णपणे नष्ट झाला होता. ज्याचं कारण भूगर्भातील वाढलेली उष्णता होतं.