By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2026 00:06 IST
1 / 6कल्याण-डोंबिवली महापालिकेत मनसे सत्तेत सामील झाली. त्यामुळे उद्धवसेना काय करणार, याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत. महापौर निश्चित होईपर्यंत राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे दिसत असून, आज उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर कल्याण-डोंबिवलीतील पक्षाच्या नगरसेवकांनी तसेच संकेत दिले.2 / 6तुमच्या नगरसेवकांना कोणी संपर्क केला होता, असा प्रश्न उद्धवसेनेचे नगरसेवक उमेश बोरगावकर विचारण्यात आला. ते म्हणाले, 'आमचे संपर्क आहे. वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरु आहे. आम्हाला भाजपा आणि शिंदेसेनेने संपर्क केला आहे. पाठिंबा मागण्यासाठी संपर्क केला आहे.'3 / 6उद्धव ठाकरेंच्या मातोश्रीवरील भेटीनंतर बोरगावकर माध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले, 'आम्ही आज सदिच्छा भेट घ्यायला आलेलो. या निवडणुकीनंतर सर्व सदस्यांना भेटण्याची इच्छा होती आणि त्यांचे (उद्धव ठाकरे) मार्गदर्शन झाले.'4 / 6'पुढची वाटचाल कशी असायला पाहिजे, यासंदर्भात आम्ही सविस्तर चर्चा केली. उद्धव ठाकरेंनी मार्गदर्शन केलं', असेही बोरगावकर यांनी सांगितले. 5 / 6'जर पाठिंब्याबाबत कोणत्याही पक्षाने आमच्याकडे प्रस्ताव दिला आणि तो सन्मानजनक असेल आणि त्याबाबत आम्ही विचार कसा करावा आणि काय करावा, त्याबद्दल आमची चर्चा झाली.6 / 6बोरगावकर यांच्या विधानानंतर उद्धवसेनेला महापालिकेतील सत्तेत कोणता सन्मानजनक प्रस्ताव अपेक्षित आहे? हा प्रश्न समोर आला आहे. मूळात भाजपा आणि शिंदेसेना दोन्ही पक्षांनी पाठिंबा मागितल्याने दोन्ही पक्षांची चाल काय आहे, अशीही चर्चा यानिमित्ताने सुरू झाली आहे.