कल्याणच्या आर. बी. कारिया शाळेत 'आंतराष्ट्रीय चिखल दिन' साजरा
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2018 15:40 IST2018-06-30T15:32:34+5:302018-06-30T15:40:52+5:30

कल्याण पश्चिमेतील आर.बी.कारिया इंग्रजी शाळेने या अनोख्या 'आंतरराष्ट्रीय चिखल दिना'चे आयोजन केले होते.
नव्या पिढीला मैदानी खेळांकडे आकर्षित करून त्यांची मातीशी पुन्हा एकदा नाळ जोडण्याचा कल्याणच्या आर.बी.कारिया इंग्रजी शाळेचा मानस होता.
अत्यंत आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजऱ्या झालेल्या या संकल्पनेमध्ये चिमुरड्यां विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत मनमुराद आनंद लुटला.
मातीत खेळताना सुरुवातीला काहीसे कावरे बावरे झालेले हे चिमुरडे नंतर मात्र वेळ संपला तरी मातीतून, चिखलातून बाहेर यायला तयार नव्हते.
चित्र काढणे, शिल्प बनवणे, वेगवेगळे आकार बनवणे, कुंभाराच्या चाकावर विविध भांडी बनवणे याबरोबरच चिखलात रस्सीखेच खेळणे आदी एकाहून एक सरस असे उपक्रम याठिकाणी राबविण्यात आले.