डोंबिवलीत फेरीवाल्यांकडून पुन्हा अतिक्रमणास सुरुवात
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2018 20:31 IST2018-01-21T20:27:10+5:302018-01-21T20:31:09+5:30

रेल्वे स्थानकापासून 150 मीटर अंतरार्पयत फेरीवाल्यांना व्यवसाय करण्यास न्यायालयाचे मनाई आदेश असताना या आदेशाचे डोंबिवली पुर्वेकडील भागात सर्रासपणे उल्लंघन होत आहे.
न्यायालयाने मज्जाव केलेल्या परिक्षेत्रत बिनदिककतपणो फेरीवाल्यांचे अतिक्रमण सुरू आहे.
अगदी रस्त्याच्या मधोमध फेरिवाल्यांनी बस्तान बसवल्याचे दिसत आहे.
फेरीवाल्यांकडे खरेदीसाठी गर्दी होत असल्याने पादचाऱ्यांना त्रास सहन करावाला लागत आहे.